Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र संभाजीनगर दंगलीचे मास्टर माईंंड फडणवीस; चंद्रकांत खैरेंचा आरोप

संभाजीनगर दंगलीचे मास्टर माईंंड फडणवीस; चंद्रकांत खैरेंचा आरोप

Subscribe

संभाजीनगरः संभाजीनगर दंगलीचे मुख्य मास्टर माईंड देवेंद्र फडणवीस आहेत, असा थेट आरोप ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी गुरुवारी केला. या दंगलीबाबात एबीपी माझा या वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना खैरे यांनी हा आरोप केला.

चंद्रकांत खैरे म्हणाले, केंद्रीय मंत्री भागवत कराड आणि एमआयएमचे इम्तियाज जलील यांचे घनिष्ठ संबंध आहेत. त्यांनीच ही दंगल घडवून आणली आहे. या दंगलीचे मुख्य मास्टर माईंड देवेंद्र फडणवीस आहेत. फडणवीस आणि भाजप या दंगलीचे मुख्य सुत्रधार आहेत. एमआयएम ही भाजपची बी टीम आहे. त्यांच्या माध्यमातूनच ही दंगल घडवण्यात आली आहे.

- Advertisement -

मी संभाजीनगरचा पालकमंत्री होतो. आम्ही येथे कधीच अनुचित प्रकार घडू दिला नाही. येथे नेहमी कायदा व सुव्यवस्था ठेवली. शांतता राखली. पण आता येथे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. गृहमंत्री कुठे आहते. त्यांचे लक्ष नाही. आज रामनवमी आहे. दोन दिवसांनी महाविकास आघाडीची सभा आहे. त्यामुळेच ही दंगल घडवण्यात आली आहे. मात्र या दंगलीचा काहीही परिणाम सभेवर होणार नाही.

आज संध्याकाळ पर्यंत पोलिसांनी या दंगलीसाठी दोषी असणाऱ्यांना अटक करावी. कारण पोलिसांना मारहाण झाली आहे. पोलिसांच्या गाड्या फोडल्या आहेत. आम्ही पोलिसांना काही बोललो की गुन्हे दाखल करता. मग दंगलीसाठी दोषी असणाऱ्यांवर तातडीने कारवाई करायला हवी, अशी मागणी खैरे यांनी केली.

- Advertisement -

दरम्यान, जळगावमध्येही दोन दिवसांपूर्वी दोन गटात दगडफेक झाली. नमाज सुरु असताना लाऊडस्पिकर लावण्यात आला होता. त्यामुळे ही घटना घडली आहे.

- Advertisment -