रावसाहेब दानवेंनी माझ्या पराभवासाठी रुग्णालयात बसून पैसे वाटले, चंद्रकांत खैरेंचा आरोप

भागवत कराड यांना मी नगरसेवक केलं, त्यांना मीच महापौरही केलं आहे. मी त्यांच्यापेक्षा मोठा नेता आहे.

Chandrakant Khaire alleges Raosaheb Danve distributed money for my defeat
रावसाहेब दानवेंनी माझ्या पराभवासाठी रुग्णालयात बसून पैसे वाटले, चंद्रकांत खैरेंचा आरोप

केद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी माझा पराभव करण्यासाठी रुग्णालयात बसून पैसे वाटले असा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. भाजप नेते दानवेंमुळे आपला परभव झाल्याचा गौप्यस्फोट खैरेंनी केला आहे. तसेच केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांना आपणच नगरसेवक, महापौर केलं असून मी मोठा नेता आहे. त्यांची आणि माझी तुलना होऊ शकत नाही असे वक्तव्य शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे. चंद्रकांत खैरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली असून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर आरोप केला आहे.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाजप नेत्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे की, भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी लोकसभा निवडणूकीमध्ये माझा पराभव करण्यासाठी रुग्णालयात बसून पैसे वाटले. त्यांच्या जावयाला पुढे करुन माझा दानेवेंनी पराभव केला आहे. मात्र तोच जावई आता त्यांना शिव्या देत आहेत. असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

शिवसेनेला शह देण्यासाठी कराड यांना मंत्रिपद देण्यात आल असेल तर बरं आहे. उलट शिवेसेनेच कार्यकर्ते खडबडून जागे होतील आणि कामालाही लागतील. भागवत कराड यांना आता लोकसभेचं तिकिट दिलं तर काही हरकत नाही. औरंगाबाद शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसेनेची ही जागा आहे. युतीमध्येही शिवसेनेची जागा होती आता महाविकास आघाडीमध्येही शिवसेनेची जागा आहे. अशी प्रतिक्रिया चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे.

माझी उंची मोठी

केंद्रीय मंत्री भागवत कराड आणि रावसाहेब दानवेंना शुभेच्चा दिल्या का? असा प्रश्न चंद्रकांत खैरे यांना करण्यात आला होता. यावर माझी उंची खुप मोठी आहे. मी दिल्लीत गेलो होतो मात्र मला वेळ मिलाला नाही यामुळे केंद्रीय मंत्री भागवत कराड यांना भेटलो नाही. भागवत कराड मला भेटायला येतील ते मला नेता मानतात असे चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे. तर रावसाहेब दानवेंना मी का शुभेच्छा द्याव्यात ? असा सवाल चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. रावसाहेब दानवेंनी माझ्या पराभवासाठी १५ आमदारांना कामाला लावले होते. त्यांच्यामुळे माझ्या विरोधात अर्धा भाजप काम करत होता. त्यांचे का अभिनंदन करायचे असेही चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.

भाजप नेत्यांवर आगपाखड

शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्यावर टीका केली आहे. भागवत कराड यांना मी नगरसेवक केलं, त्यांना मीच महापौरही केलं आहे. मी त्यांच्यापेक्षा मोठा नेता आहे. त्यांची माझी तुलना होऊ शकत नाही असे वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे. तसेच त्यांची भेट झाली नाही मात्र कराड स्वतः भेटतील असे वक्तव्यही चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे.