बंडखोर आमदारांना भाजपने ७ हजार कोटी रूपये दिले, चंद्रकांत खैरे यांचा आरोप

Chandrakant Khaire

शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना भाजपने ७ हजार कोटी रूपये दिले असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. ज्या दिवशी शिवसेना पक्ष हायजॅक कराल त्या दिवशी महाराष्ट्रातील शिवसैनिक तुम्हाला जाळून टाकल्या शिवाय राहणार नाही, असं वक्तव्य सनेचे माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी केलं आहे.

जालन्यातील मोर्चामध्ये चंद्रकांत खैरे आणि माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी खळबळजनक वक्तव्य केली आहेत. संघाच्या लोकांना विचारा, संघ परिवाराला देखील आम्हीदेखील डोनेशन देतो. मात्र, ते आपला पैसा तिकडे वापरतात असा आरोपही चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. एक रिक्षावाला एवढा मोठा होतो कसा?, एकनाथ शिंदे आनंद दिघे यांचा डुप्लिकेट शिवसैनिक आहे.

ज्या दिवशी शिवसेना पक्ष हायजॅक कराल त्या दिवशी महाराष्ट्रातील शिवसैनिक तुम्हाला जाळून टाकल्या शिवाय राहणार नाहीत असं शिवाजीराव चोथे यांनी म्हटलं आहे. शिवसेना बंडखोर आमदारांना गुवाहाटीला घेऊन गेलेल्या एकनाथ शिंदेंना जादूटोणा येत असल्याचं वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी या आधी केलं होतं. वैजापूर तालुक्याचे बंडखोर आमदार रमेश बोरणारे यांच्या मतदारसंघात शिवसेना मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं.

त्या गुवाहाटीत काय चालू आहे, आमदारांना कसं बेकार करून ठेवलंय. त्यांच्यावर जादूटोणा करण्यात आला आहे. कारण एकनाथ शिंदे हे जादूटोणा करतात. त्यांच्या तोंडामध्ये सतत एक कोणतीतरी पांढरी गोळी असते, असं म्हणत चंद्रकांत खैरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.


हेही वाचा : फ्लोअर टेस्ट घ्या, त्यावेळी आमची भूमिका मांडू – दीपक केसरकर