घरताज्या घडामोडीऔरंगाबादच्या दोन बड्या नेत्यांमध्ये मतभेद, उद्धव ठाकरेंसमोरच दोघेही भिडले

औरंगाबादच्या दोन बड्या नेत्यांमध्ये मतभेद, उद्धव ठाकरेंसमोरच दोघेही भिडले

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वात मोठं बंड केल्यानंतर ४० आमदार आणि १० अपक्ष आमदारांनी शिंदे गटात जाणं पसंत केलं. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला औरंगाबादही याला अपवाद ठरलेली नाहीये. कारण औरंगाबादमधून देखील शिवसेनेच्या सहा आमदारांनी ठाकरेंची साथ सोडली आहे. दरम्यान, औरंगाबादच्या दोन बड्या नेत्यांमध्ये अनेक मुद्द्यांवरून मतभेद झाल्यामुळे हा वाद उद्धव ठाकरेंच्या समोरच उघडकीस आला आहे.

औरंगाबादचे दोन बडे नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे हे ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून सेना वाचविण्यासाठी लढत आहेत. पण आज या दोन्ही नेत्यांमध्ये असलेले मतभेद थेट ठाकरेंच्या समोर आले आहेत. तसेच दोघे नेते मातोश्रीमध्ये उद्धव ठाकरेंसमोरच भिडले आणि काही मिनिटे त्यांच्यात तू तू मैं मैं सुरु होती. मात्र, उद्धव ठाकरेंनी या दोन्ही नेत्यांनी शांत केलं.

- Advertisement -

मराठी वृत्त वाहिनीने हे सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिलं आहे. पक्षाविरोधी कारवाई केल्यामुळे शिवसेनेतून कोणत्या ना कोणत्या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी केली जात आहे. मात्र, आज औरंगाबादच्या जिल्हाप्रमुख पदावर कुणाला नेमायचं?, याबाबत चर्चा सुरु असताना चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यात जोराचं भांडणं झालं. किशनचंद तनवाणी यांची जिल्हाप्रमुखपदी नेमणूक करण्यात आली. यावरुन खैरे-दानवे उद्धव ठाकरेंसमोरच एकमेकांना भिडले.

अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यातील मतभेद अनेक वेळा समोर आले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अंबादास दानवेंनी चंद्रकांत खैरेंचं काम केलं नाही. त्यामुळे विरोधी उमेदवाराला बळ दिलं, असा आरोप त्यांच्यावर करण्यात येतो. त्यामुळे या मुद्द्यावरून दोन्ही नेते नेहमी आरोप-प्रत्यारोप करतात.

- Advertisement -

मागील तीन आठड्यांपूर्वी उद्धव ठाकरेंना समर्थन देण्यासाठी खैरे-दानवेंनी औरंगाबाद शहरात हजारो शिवसैनिकांचा मोर्चाही काढला. त्यामुळे दानवे-खैरे यांच्यातील कटुता दूर झाली, पण आता पुन्हा एकदा दोन्ही नेत्यांमध्ये जोराचं भांडण झालं असून उद्धव ठाकरेंसमोर हा वाद समोर आला आहे. परंतु उद्धव ठाकरे यामध्ये काय निर्णय घेतात किंवा त्यांची भूमिका काय असणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा : राज्यात आज 1812 कोरोना रुग्णांची नोंद, तर एका रुग्णाचा मृत्यू


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -