Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र खोक्यातून मिळालेले किती पैसे गोव्यात जाऊन हरले, हे संजय शिरसाटांनी सांगावे :...

खोक्यातून मिळालेले किती पैसे गोव्यात जाऊन हरले, हे संजय शिरसाटांनी सांगावे : चंद्रकांत खैरे

Subscribe

ठाकरे गट आणि शिवसेना यांच्यामधील वाद आता विकोपाला गेल्याचे दिसून येत आहे. दोन्हीही गट एकमेंकांवर अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्यावर केलेल्या टीकेला आता ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

आधी एकत्र वावरलेले शिवसेनेचे आमदार आणि खासदार आता दोन गट झाल्यामुळे एकमेकांच्या इतके विरोधात गेले आहेत की, एकमेकांवर टीका करताना ते अगदी खालच्या पातळीला जाऊन टीका करत आहेत. ज्यामुळे दिवसेंदिवस शिवसेना आणि ठाकरे गट यांच्यामधील वाद विकोपाला जात असल्याचे दिसून येत आहे. काल रविवारी (ता. २६ मार्च) मालेगाव येथे उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या सभेवरून शिवसेनेच्या आमदारांनी टीका करण्यास सुरूवात केली आहे. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली. या टीकेला ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

संजय शिरसाट यांच्यावर टीका करत चंद्रकांत खैरे म्हणाले की, संजय शिरसाट यांना जुगाराची नाद असल्याचे, नक्कल करुन सांगितलं. तुमची किती लफडी आहेत, काढले तर खूप लफडे येतील. आणि सुषमा अंधारे तुमच्या मतदारसंघात येऊन तुमची लफडी बाहेर काढतील. आता, गोव्याला हारुन आलेत हे..” असे म्हणत खैरे यांनी हातावर हात मारत जुगारीची नक्कल करुन दाखवली.

- Advertisement -

काय म्हणाले होते संजय शिरसाट?
ती बाई म्हणते सगळेच माझे भाऊ आहेत. पण तिने काय लफडी केलेली आहेत, हे तिलाच माहिती, अशी टीका करताना संजय शिरसाट यांची सुषमा अंधारेंच्या बाबतीत जीभ घसरली. तर, अरे पण तू आहे तरी कोण? आम्ही आमची ३८ वर्षे शिवसेनेसाठी घालवली. आता तुम्ही येऊन आम्हाला मार्गदर्शन करताय आणि काही उरलेले लोक टाळ्या वाजवत आहेत, असेही संजय शिरसाट म्हणाले होते.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मालेगावमधील सभेत शिवसेनेच्या आमदारांवर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली होती. ज्यानंतर या दोन्ही पक्षांमधील वाद आणखीनच विकोपाला गेल्याचे पाहायला मिळत आहे. तर बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेचे आमदार आणि खासदार यांनी सुरत, गुवाहाटी आणि गोवा असा प्रवास केला होता. त्यांचे ते फोटोसुद्धा सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते आणि म्हणूनच आता चंद्रकांत खैरे यांनी गोव्याला पैसे हारून आल्याचा टोला संजय शिरसाट यांना लगावला.


- Advertisement -

हेही वाचा – राहुल गांधींच्या थोबाडीत देण्याची हिंमत आहे का? मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

- Advertisment -