घरताज्या घडामोडीबाळासाहेबांमुळे मोठा झालात हे विसरु नका, चंद्रकांत खैरेंनी राणे बंधूंना फटकारले

बाळासाहेबांमुळे मोठा झालात हे विसरु नका, चंद्रकांत खैरेंनी राणे बंधूंना फटकारले

Subscribe

शिवसेना हिंदुत्व विसरली नाही आमचे हिंदुत्वाचे कार्यक्रम सुरुच

भाजप नेते निलेश राणे आणि नितेश राणे यांना आपण कोणामुळे मोठे झालोय याचा विसर पडलेला दिसत आहे. राणे बंधू काहीही करु शकत नाही असे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे. राणे कुटूंबीय आणि राणे बंधू नेहमीच शिवसेनेवर टीका आणि भ्रष्टाचारांच्या आरोपावरुन निशाणा साधत असतात. ते नुसतं बोलत असतात परंतु काहीही करत नाही आपले वडील कोणामुळे मोठे झालेत हे विसरु नका असा सल्लाही चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे. शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. राज्यातील कोरोना परिस्थिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळं आटोक्यात आली आहे राज्यातील जनता समाधानी असून मुख्यमंत्र्यांच्या कामाचे कौतुक करत असल्याचा चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये खैरेंनी राणे बंधुंवर निशाणा साधला आहे. निलेश राणे आणि नितेश राणे सतत शिवसेनेवर टीका करत असतात. जेव्हा नारायण राणेंनी शिवसेनेशी फारकत घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हा निलेश राणे सरकारी गाडी घेऊन फिरत होते त्यावेळी आम्ही दम भरत होतो. त्यांच्यावर केसही टाकली होती हे त्यांना माहिती असेल अशी आठवण चंद्रकांत खैरे यांनी सांगितली तसेच राणे बंधू यांनी आपण कोणामुळे मोठं झालो आहोत याचा विसर पडला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच नारायण राणे मोठे झाले आहेत त्यामुळे उपकार विसरु नका असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांच्या कामाचे राज्यात कौतुक

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भावाने हाहाकार घातला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यामध्ये आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपाययोजना चांगल्या आहेत. मराठवाड्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आली आहे. कोरोना संकटात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रशासनाने केलेल्या कामांमुळे जनता फिरु शकत आहे. मराठवाड्यातील जनता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कामाबाबत समाधानी आहे. मुख्यमंत्र्यांचे कौतुक करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांमुळे कोरोना परिस्थिती आटोक्यात आली असल्याचे जनतेचं मत आहे. अशी माहिती चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे.

राम मंदिर घोटाळ्याच्या बाबत शिवसेनेकडून कोणाताही आरोप करण्यात आला नाही परंतु राम मंदिराच्या घोटाळ्याबाबत सत्य जनतेसमोर आले पाहिजे अशी भूमिका शिवसेनेची आहे. शिवसेनेकडून श्री राम मंदिरासाठी १ कोटी रुपयांची देणगी देण्यात आली आहे. तसेच स्वतः देखील १ लाख १११ रुपयांची देणगी दिली असल्याची माहिती खैरेंनी दिली आहे. शिवसेना हिंदुत्व विसरली नाही आमचे हिंदुत्वाचे कार्यक्रम सुरुच आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाबद्दलचं मार्गदर्शन आणि त्यांचे वाक्य आमच्या मनावर कोरलं गेलं आहे असे चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -