एकनाथ शिंदे 15 आमदारांसह काँग्रेसमध्ये जाणार होते, चंद्रकांत खैरेंचा गौप्यस्फोट

yeknatha shinde

औरंगाबाद –शिवसेना आणि भाजपची युती असताना एकनाथ शिंदेंसह आलेल्या एका शिष्टमंडळाने काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी सत्तास्थापन करण्याचा प्रस्ताव दिल्याचा गौप्यस्फोट काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे. त्यांच्या दाव्याला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दुजोरा दिला आहे. पुढे त्यांनी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतांना आम्हाल काँग्रेसमध्ये यायचे असल्याचे म्हणत एकनाथ शिंदे पृथ्वीराज चव्हाण यांच्या मागे लागले असल्याचा नवा दावा खैरेंनी केला आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलतांना खैरे म्हणाले जी गद्दारी एकनाथ शिंदे यांनी केली आहे ती, यापूर्वी सुद्धा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. शिवसेनेचे 15 आमदार सोबत घेऊन काँग्रेसमध्ये जाण्यासाठी शिंदेंनी खूप प्रयत्न केला होता. मात्र, याबाबत शिवसेनेच्या काही नेत्यांना कुणकुण लागल्याने तो विषय थांबला होता. त्यामुळे आम्हाला तुम्ही काँग्रेससोबत गेल्याचे म्हणणारे शिंदे स्वतः काँग्रेससोबत जात होते त्याचे काय?, असा टोला खैरे यांनी मुख्यमंत्री शिंदेंना लगावला आहे.

एकनाथ शिंदे 15 आमदारांसह काँग्रेसमध्ये जाणार होते –

एकनाथ शिंदे त्यावेळी शिवसेनेचे 15 आमदार घेऊन काँग्रेसमध्ये जाणार होते. याबाबत मला एकदा आमदार संजय शिरसाट म्हणाले होते की, त्याचे काही खरे नाही. शिंदे हे कधीपण कुठेही जाऊ शकतात. त्यामुळे यांच्या मनात आधीपासूनच पाप होते असे खैरे म्हणाले.