Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी राज्याचे दीड वर्षात अनेक वर्षांपेक्षा जास्त नुकसान, चंद्रकांत पाटील यांचा ठाकरे सरकारवर...

राज्याचे दीड वर्षात अनेक वर्षांपेक्षा जास्त नुकसान, चंद्रकांत पाटील यांचा ठाकरे सरकारवर आरोप

मारुन मुटकून सरकारमध्ये आले असले तरी मुंबईची अवस्था वाईटचं

Related Story

- Advertisement -

गेल्या अनेक वर्षात जेवढं राज्याचे नुकसान झाले नाही तेवढं मागील दीड वर्षात राज्य सरकारने केलं आहे. असा घणाघात चंद्रकांत पाटील राज्य सरकारवर केला आहे. राज्य सरकारने सिस्टम मोडली आहे. कोरोनाचा गोंधळ, आगीच्या घटना, इमारत दुर्घटना अशा अनेक घटना घडत असताना राज्य सरकार गोंधळ घालत आहे. राज्यात कोरोनामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकारने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांची आकडेवारी लपवली असल्याच्या चर्चा होत आहे. जर आकडेवारी लपवली असेत तर राज्यात जवळपास लाखाच्या वर कोरोनामृत्यूची नोंद होईल असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुण्यात माध्यमांशी संवाद साधत होते. राज्य सरकार सत्तेत आल्यापासून राज्याचे मोठं नुकसान झाले आहे. गेल्या अनेक वर्षात जेवढं राज्याचे नुकसान झाले नसेल तेवढे राज्य सरकारने दीड वर्षात केलं आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे राज्य सरकारने सिस्टम मोडली आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जीएडीने फाईल फेटाळल्यानंतर एखाद्याची नियुक्ती करतात आणि ज्या फाईलवर सही करण्यास मुख्यमंत्री नकार देतात याला सिस्टम तोडणं म्हणतात. ओबीसी आरक्षणाच्या बाबतीतही तेच आहे. न्यायालयाने सांगितल्यानंतरही प्रशासन हालचाल करत नाही याचा अर्थ प्रशासनाने सरकारला अडचणीत आणायचे ठरवले आहे का? असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

- Advertisement -

राज्यात कोरोना असुदेत, आगीच्या घटना असोत, इमारती पडो, दहावीच्या परीक्षा, बारावीची परीक्षा जेवढा गोंधळ घालता येईल तेवढा राज्य सरकार घालत आहे. विरोधी पक्षाचा नेता असल्यामुळे आम्ही बोल्यास बोलतात यांच्या पोटात दुःखत हे काय डॉक्टर आहेत. का आमच्या पोटात दुःखतंय बघायला असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

मुंबईतील घटनांवर सरकारकडे बजेट नाही

मुंबईत पहिल्या पावसाताच मुबईची तुंबई झाली आहे. मी स्वतः मुंबईतील ट्रॅफिकमध्ये बुधवारी अडकलो असतो असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. मुंबईत इमारती पडत आहेत. अनेक इमारती मोडकळीस आल्या आहेत यावर निर्णय नाही तसेच कार्यवाही नाही. राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेकडे बजेट नाही. मारुन मुटकून सरकारमध्ये आले असले तरी मुंबईची अवस्था वाईटच आहे. यामुळे येणाऱ्या फेब्रुवारी महिन्याच्या निवडणुकीत मुंबईकर हे दाखवून देतील की तुम्ही आम्हाला गृहित धरु नका असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

- Advertisement -