नाना पटोलेंविरोधात गावोगाव तक्रारी दाखल करा, चंद्रकांत पाटलांचे कार्यकर्त्यांना आवाहन

chandrakant-patil-and-nana-patole

महाराष्ट्र कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीमध्ये गृहमंत्री अमित शहांचा हात असल्याचा आरोप केला आहे. आपल्या देशातील पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित घटनेबाबत संपूर्ण भारताचे लक्ष लागून राहिले आहे. पण नाना पटोलेंच्या वक्तव्यात मात्र कोणतेही गांभीर्य नसल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. नाना पटोले हे बेलगामपणे वक्तव्य करत आहेत. देशाच्या पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांवर बोलण्याइतके हे बेलगाम झाले आहेत का ? पंतप्रधान आणि गृहमंत्री म्हणून त्यांना काही अधिकार आहे की नाही ? असाही सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला. नाना पटोले यांच्या बेलगाम वक्तव्याविरोधात राज्यातील कार्यकर्त्यांना गावोगावी तक्रार करण्याचे मी आदेश देत असल्याचेही पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटलांनी नाना पटोलेंना उत्तर देताना म्हटले की नौटंकी तुमची चाललेली आहे. तुम्ही विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देता. त्यानंतर सत्तेतील इतर कोणत्याही पक्षाला माहिती नसते. त्यानंतर तुम्ही प्रदेशाध्यक्ष होता आणि मंत्रीपदासाठी धावाधाव करता. पण मंत्रीपद न मिळाल्यानेच जळफळाट करता. त्यामुळे खरी नौटंकी नाना पटोले करत आहेत. राणे साहेब म्हणाले की नितेश कुठे आहे हे सांगितल्यावर तुम्ही, नोटीसा काढता. मी असतो तर थोबाडीत मारले असती असे फक्त म्हटल्यासाठी तुम्ही अटक करता. मग नाना पटालोंच्या बेताल आणि बेलगाम वक्तव्याविरोधात गावोगाव केसेस दाखल करण्याचे आवाहन करतो आहे. मी सगळ्या जिल्हाध्यक्षांना याबाबतचे आदेश केबिनमधून देईन असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. देशाच्या गृहमंत्र्यांवर, पंतप्रधानांवर बोलता. पंतप्रधानांना नौटंकी म्हणता, एवढे हे बेलगाम झाले आहेत का ?

अमृता फडणवीस विद्या चव्हाणांना योग्य उत्तर देतील

ऱश्मी ठाकरेंवर वक्तव्य करणाऱ्या जितेन गजारियाची पाच तास चौकशी झाली. चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केला. महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांच्यावर टीका झालेली असताना, अशी चौकशी का झाली नाही ? असाही सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला. एकाने गाय मारली मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारायचे नसते हे जरी खरे असले तरीही, ही सगळी डबल ढोलकी सुरू आहे. आमची मात्र इमेज अब्रू, इतरांची अब्रू वेशीला टांगली आहे का ? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला. अमृता फडणवीस या विद्या चव्हाण यांच्या टिकेला उत्तर देतील आणि भाजपचा कार्यकर्ता हा टिकेला घाबरणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई आणि नवी मुंबईत सत्तेचा दुरूपयोग सुरू आहे. पण उद्धवजींकडे आणि दिलीप वळसे पाटील यांच्याकडे नोकरीला असल्यासारखे वागत आहात. तुम्ही आज सत्तेत आहात, त्यामुळे तुम्ही आम्हाला वाट दाखवता आहात, की तुम्ही मुर्ख आहात. आम्ही पाच वर्षात अशा गोष्टी केल्या नाहीत. त्यामुळे आम्हीही सत्तेत येणार आहोत. त्यावेळी आम्हालाही अशा गोष्टी करण्यासाठी तुम्ही वाट दाखवता आहात, असेही ते म्हणाले.