घरताज्या घडामोडीKolhapur Byelection: भगव्याला मतदान म्हणजे... उद्धव ठाकरेंच्या आवाहनाचा अर्थ चंद्रकांतदादांनी सांगितला

Kolhapur Byelection: भगव्याला मतदान म्हणजे… उद्धव ठाकरेंच्या आवाहनाचा अर्थ चंद्रकांतदादांनी सांगितला

Subscribe

उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व पुसल जाणार नाही असे म्हटले आहे. म्हणजेच भगव्या रंगाला मतदान करा असे म्हटले आहे. त्यामुळे समझने वालोको इशारा काफी है असच म्हणावे लागेल. उद्धवजींना सगळ्यांना आवाहन केले आहे की भगव्याला पुसू नका, त्यामुळे शिवसैनिकांनी ठरवायचे आहे, भगवा म्हणजे भाजप की कॉंग्रेस. आपण आपआपसातील भांडण चालू ठेवू, पण या भांडणात कोल्हापुरची हिंदुत्वाची जागा जाणार आहे, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. कोल्हापुरातील भगव संपवू नका, म्हणजे भाजपला मतदान करा असेच ते म्हटले आहे, म्हणजे लोकांनी काय संदेश घ्यायचा ते मतपेटीत दिसेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीसाठी केलेल्या भाषणानंतरच्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील बोलत होते.

कॉंग्रेसला निवडून आणण्याच्या नादात शिवसेना राज्यातील परंपरागत मतदारसंघ शिवसेना संपवणार आहे. राजकारणात सिटिंग सीटच्या लॉजिकने शिवसेनेची सीट गेली आहे. आम्हाला शिवसेनेचा नाही, हिंदुत्वाचा पुळका नाही. त्याठिकाणी कॉंग्रेस, राष्ट्रवादी निवडून येणार आणि शिवसैनिक तसेच हिंदुत्ववादी उघड्या डोळ्यांनी ते बघत बसणार अशीही टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

- Advertisement -

अविश्वासाने जे मुख्यमंत्रीपद मिळाल ते टिकवून ठेवण्यासाठी शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांनी आज आवाहन केले. कोल्हापूरच्या जागेवर सातपैकी ५ वेळा शिवसेना आणि दोनवेळा कॉंग्रेस जिंकली आहे. मुख्यमंत्र्यांनी आज बोलताना सांगितले की, मी आज एक प्रयोग करत आहे. या प्रयोगात भांडण नको, म्हणून तुमची आहुती द्या असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले आहे. कोल्हापुरची हिंदुत्ववादी जागा आहे. हिंदुत्ववाद न मानणाऱ्या कॉंग्रेसच्या ताब्यात जाऊ नये, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. याआधी शिवसेना २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये शिवसेनेला याठिकाणी ७० हजार मतदान झाले आहे. भाजपचा वाटा सोडून देऊ ३५ हजार मत शिवसेनेची असली तरीही हे मतदान आता कॉंग्रेसला जाणार आहे. त्यामुळे येत्या काळात २०२४ मध्ये सेना भाजप एकत्र लढली, तर गेलेला मतदार तुम्हाला पुन्हा एकत्र आणता येणार नाही असाही दावा त्यांनी केला.

बाळासाहेबांचे स्थान आम्ही मान्य करतो

हिंदुह्दयसम्राट बनवण्याचा प्रयोग कधी केला नाही, अन् करणार नाही. असा प्रकार हा समाज मान्य करणार नाही. उलट शिवसेनेनेच त्यांच्या नावापुढे जनाब लावले. हिंदुह्दयसम्राट झाले नाही, होणारही नाही. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंचे स्थान आम्ही मान्य करतो अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले.

- Advertisement -

Kolhapur byelection : अटलजी, अडवाणीजी कुठे आहेत ? होर्डिंगवर सरपंच अन् पंतप्रधानपदालाही एकच फोटो- उद्धव ठाकरे

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -