Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी महाविकास आघाडीमध्ये पुढील ८ दिवसांत तिसरा राजीनामा येणार - चंद्रकांत पाटील

महाविकास आघाडीमध्ये पुढील ८ दिवसांत तिसरा राजीनामा येणार – चंद्रकांत पाटील

आम्हाला कोणाच्याही कुबड्यांची मदत नको - चंद्रकांत पाटील

Related Story

- Advertisement -

महाविकास आघाडी सरकारमध्ये १ महिन्यापूर्वी एका मंत्र्याचा राजीनामा घेण्यात आला होता. यानंतर अवघ्या महिन्याभरातच दुसऱ्या मंत्र्याचा राजीनामा झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी येत्या आठवड्याभरात महाविकास आघाडीमध्ये तिसरी विकेट म्हणजेच तिसरा राजीनामा होणार असल्याचा इशाराच दिला आहे. त्यामुळे आता संजय राठोड आणि अनिल देशमुख यांच्यानंतर कोणावर राजीनामा देण्याची वेळ येते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. २०२४ मध्ये विधानसभा निवडणूकीत स्वबळावर लढून सरकार स्थापन करु असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

भाजपच्या ४१व्या वर्धापन दिन साजरा करताना चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आह की, आज आमचा वर्धापन दिन आहे. आम्ही हा अभासी माध्यमाद्वारे साजरा केला. येत्या सगळ्या निवडणूका स्वबळावर लढायच्या आहेत. यासाठी सगळी संघटनांची बांधणी करतो आहोत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये १ कोटी ४२ लाख मते मिळाली जर आता १०० जागा जास्त लढलो तर २ कोटी मते नक्की मिळवू त्यामुळे आता आम्हाला कोणाच्याही कुबड्यांची मदत नको असे भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावरुन चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, दोन महिन्यांत २ मंत्र्यांचे राजीनामा आले आहेत. आता येत्या ८ दिवसांत तिसरा राजीनामा येईल असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केल्याने आता तिसरा राजीनामा कोणाचा या विषयी चर्चांना उधाण आले आहे.


हेही वाचा : उद्धव ठाकरेंच्या हाती राज्य आलंय की, उद्धव ठाकरेंवर राज्य आलंय, राज ठाकरेंचा टोला


- Advertisement -

 

- Advertisement -