घरताज्या घडामोडीराज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ठोकेन, तोडेन अशी भाषा वापरणं योग्य नाही, चंद्रकांत पाटलांचा आक्षेप

राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ठोकेन, तोडेन अशी भाषा वापरणं योग्य नाही, चंद्रकांत पाटलांचा आक्षेप

Subscribe

नाना पटोलेंनी जे काही वक्तव्य केलं आहे. त्याविरोधात काँग्रेसने विचार केला पाहीजे. काल स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने शिवसैनिकांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे भाषण केलं होतं. ते साधारणत: दसऱ्याला तेच भाषण होतं आणि आधीच्या दसऱ्यालाही तेच भाषण होतं. एखादा माणूस चुकला किंवा निराश झाला की त्यामुळे तो थयथयाट करतो. तसेच थयथयाटच्या माध्यमातून आपली भुमिका कशी बरोबर आहे आणि दुसऱ्यांची कशी चुकीची आहे, असं सांगण्याचा प्रयत्न करतो. तसंच थटथयाट सर्वच भाषणामध्ये एकसारखं आहे. मात्र, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ठोकेन, तोडेन अशी भाषा वापरणं योग्य नाही, असा आक्षेप भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात घेतला आहे.

मुख्यमंत्र्यांनी ठोकेन, तोडेन अशी भाषा वापरणं योग्य नाही

चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री आणि शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. त्यावेळी ते म्हणाले की, मानसिक तणाव व्यक्त करण्यासाठी राज्याचा मुख्यमंत्री या पदावर बसल्यानंतर ही भाषा बरोबर नाहीये. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारची भाषा विसरून सर्वांना समान न्याय दिला पाहीजे. त्यांची भाषा ठोकेन, तोडेने अशीच असते. मुख्यमंत्र्यांनी अशी भाषा वापरणं योग्य नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेनी यावर विचार करण्याची गरज आहे.

- Advertisement -

४३ नगर पंचायतीमध्ये शिवसेनेला भोपळाही फोडता आलेला नाहीये

नगरपंचायतीच्या निवडणुकींमध्ये निकालांबाबत विश्लेषण करताना सही बहुधा शिवसेनेला रूसलं नाहीये. आम्ही कमी ठिकाणी लढलो याबाबत त्यांचंही काही लोकं समर्थन करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. ८ नगर पंचायतीमध्ये शिवसेनेला ९ जागा मिळाल्या आहेत. परंतु राज्यातील ४३ नगर पंचायतीमध्ये शिवसेनेला भोपळाही फोडता आलेला नाहीये. त्यामुळे ही विचार करायला लावणारी स्थिती आहे. अशा प्रकारचं अपयश जेव्हा डोळ्यासमोर येतं. त्यावेळी माणूस निराश होऊन थयथयाट करण्याचा प्रयत्न करतो. तेच करण्याचं काम उद्धव ठाकरे करत आहेत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

हिंदुत्वाबाबत आम्हाला काहीही सांगण्याची आवश्यकता नाही

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रकरणाबाबत आम्ही राज्यपालांना निवेदन दिलेलं आहे. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले होते की, राज्यपाल हा विरोधकांचा अड्डा झालेला आहे. परंतु मुख्यमंत्री जर राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांना भेटण्यास उपलब्ध नसतील तर मग महाराष्ट्राचं सर्वोच्च घटनात्मक स्थान राज्यपाल असतं. लोकायुक्त हे अद्यापही ज्यॉईन झालेलं नाहीयेत. त्यामुळे आम्ही राज्यपालांकडे गेलो होतो. तुम्ही एखादी कोणतीही गोष्ट करणार की नाही, याबाबत आम्हाला खात्री नाहीये. शिवसेना ही वारंवार हिंदुत्वाची भाषा करत आहे. हिंदुत्व हे तुम्ही सोडलंय की नाही हे काँग्रेसला तुम्ही सांगा. आम्हाला काहीही सांगण्याची आवश्यकता नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

- Advertisement -

२ वर्षांच्या कालवधीत मला एकदाच उद्धव ठाकरेंचा फोन आला होता. तसेच कोविडच्या निमित्ताने त्यांनी मला फोन केला होता. तसेच आम्ही त्यांना वाढदिवस आणि वर्धापन दिनाच्या निमित्ताने त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. तेव्हाही ते आम्हाला भेटले नाहीत. आम्ही आजारपणाच्या काळात आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळीही ते उपलब्ध नव्हते. फक्त कोविडच्या आढाव्यामध्ये त्यांची आणि आमची भेट झाली होती. मात्र, मला जर भेटणं इतका दुरचा विषय असेल तर सर्वसामान्यांना आनंदच आहे, असं पाटील म्हणाले.

गावगुंडांचं समर्थन भाजप नेते एवढं का करतंय? – नाना पटोलेंचा सवाल

या घटनेच्या सुरूवातीलाच मी सांगितलं होतं की, जे लोकसमुहात बोललो होतो. तेव्हा मी गावगुंडांबाबत बोललो होतो. ते स्टेटमेंट मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केलेलं नव्हतं. डॉ.मनमोहन सिंग यांच्याविरोधात भाजप काय म्हणत होते हे सर्वच देशातील जनतेला माहितीये. या गावगुंडांचं समर्थन भाजप नेते एवढं का करतय?, असा प्रश्न राज्याच्या जनतेसमोर उपस्थित झालाय. काल मी जे विधान केलं त्यामध्ये त्या वक्तव्यापेक्षा जनतेचे प्रश्न महत्त्वाचे होते,असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पेटोले म्हणाले.

नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, गावगुंडांनी माध्यमांसमोर येऊन त्यांना मोदी म्हणण्याबाबत खुलासा केला आहे. तसेच गावकऱ्यांनी त्याचं नाव मोदी का ठेवलं? तो सुद्धा उल्लेख त्याने केलाय. त्यामुळे बदनामी करण्याचं काम तुम्ही थांबवा. तसेच जर पुतळे जाळायचे असतील तर भारत माता की जय म्हणून देश विकणाऱ्यांचे जाळा. बेटी बचाव, बेटी पटाव म्हणण्याऱ्यांचे पुतळे जाळा. शेतकऱ्यांच्या अंगावार गाड्या चालून त्यांना मारणं अशा केंद्रातील मंत्र्यांच्या विरोधात त्यांचे पुतळे जाळा, असं नाना पटोले म्हणाले.


हेही वाचा : पीएम मोदींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून नाना पटोलेंविरोधात पुण्यात भाजपचं आंदोलन


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -