तुमच्या सरकारमधील पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यात आहेत ना?; मुख्यमंत्र्यांना सवाल

'मुख्यमंत्री साहेब आपल्या सरकारमधील पालक मंत्री आपआपल्या जिल्ह्यात आहेत ना?', असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांसमोर उपस्थित केला आहे.

chandrakant patil and uddhav thackeray

राज्यात करोना रुग्णांच्या आकडेवारीमध्ये सातत्याने वाढ होत असून, आता हा आकडा १५० च्यावर गेल्याची माहिती मिळत आहे. याच वाढणाऱ्या आकडेवारीवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चिंता व्यक्त करत ‘मुख्यमंत्री साहेब आपल्या सरकारमधील पालक मंत्री आपआपल्या जिल्ह्यात आहेत ना?’, असा सवाल उपस्थित केला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत हा सवाल मुख्यमंत्र्यावर समोर उपस्थित केला. राज्यात करोनाग्रस्तांची दिवसागणिक वाढणारी संख्या चिंताजनक असल्याचे म्हणत माननीय मुख्यमंत्री जी ही परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून देत निदान आपल्या सरकारमधील पालकमंत्री तरी आपापल्या जिल्ह्यात आहेत ना? असा सवाल उपस्थित केला आहे.

भाजपचेही शिवसेना-राष्ट्रवादीच्या पावलावर पाऊल

दरम्यान, नुकतेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या सर्व आमदार आणि खासदारांना एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि पंतप्रधान सहाय्यता निधी यांना देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर शिवसेनेने देखील आपल्या खासदार आणि आमदारांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा निर्णय घेतला होता. आता भाजपनेही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पावलावर पाऊल टाकत आपल्या खासदार आणि आमदारांचा एक महिन्याचा पगार भाजपा आपदा जोशमध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला असून ऑडिओ ब्रिजद्वारे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या सर्व आमदारांशी संवाद साधला.


हेही वाचा – मुंबईत करोनामुळे एका संशयित डॉक्टरचा मृत्यू