घरताज्या घडामोडीपवारांनी आबा, पतंगरावांच्या घरातच उमेदवारी दिली, पण काँग्रेसनं सातवांच्या घरात.. चंद्रकांत पाटलांचा...

पवारांनी आबा, पतंगरावांच्या घरातच उमेदवारी दिली, पण काँग्रेसनं सातवांच्या घरात.. चंद्रकांत पाटलांचा टोला

Subscribe

मी शरद पवारांबाबत बोलतो खूप परंतु त्यांच्या या गोष्टीला मी सलाम ठोकतो.

राजकारणामध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविषयी टीका करतो परंतु एका गोष्टीमध्ये त्यांना मी मानतो असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी रजनी पाटील यांना उमेदवारी दिल्यावरुन टीका केली आहे. राष्ट्रवादीकडून आर आर पाटील, पतंगराव यांच्या रिक्त जागांवर त्यांच्या घरातील व्यक्तीला उमेदवारी दिली होती. महाराष्ट्राची परंपरा होती. परंतु काँग्रेसनं राजीव सातव यांच्या घरात उमेदवारी न देता बाहेर रजनी पाटील यांना दिली असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. या पोटनिवडणुकासाठी भाजपकडून संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली असून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये संजय उपाध्याय यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेसवर निशाणा साधला आहे. तर शरद पवार यांचे कौतुक केलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की, राजीव सातव यांच्या घरात द्यायला पाहिजे होती.महाराष्ट्राची परंपरा ही आर आर पाटील यांच्या निधनानंतर उमेदवारी त्यांच्या घरातील व्यक्तीला देण्याची आहे. आर आर पाटील , पतंगराव कदम यांच्या निधना नंतर त्यांच्या घरातील व्यक्तीला उमेदवारी दिली आहे. आर आर पाटील यांच्या पत्नी कधीही राजकारणात नव्हत्या, त्यांची मुलं लहान होती तरीही शरद पवार यांनी आबांच्या बायकोला उमेदवारी दिली. मी शरद पवारांबाबत बोलतो खूप परंतु त्यांच्या या गोष्टीला मी सलाम ठोकतो. पतंगराव कदमांच्या जागी विश्वजीत कदमला उमेदवारी दिली.

- Advertisement -

काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर भाजपमधील माझ्यासह, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार यांची अपेक्षा होती की, राजीव सातव यांच्या घरात उमेदवारी देतील. परंतु त्यांनी दिले रजनी पाटील यांना ज्यांच्याबाबतीत काही आरोप आहेत. जे थोड्या दिवसांत बाहेर येतील. असे चंद्रकात पाटील यांनी म्हटलं आहे.

राऊतांनी रक्कमेत वाढ करावी

चंद्रकांत पाटलांना राऊतांच्या अब्रुनुकसानीच्या दाव्याबाबत प्रश्न केला. यावर चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की, हरकत नाही, कोणी १०० कोटी, कोणी १५० कोटी तर हे सव्वा रुपया फक्त ते माझे मित्र असल्यामुळे मी त्यांना सुचवेल की, थोडी रक्कम वाढवावी लागेल याचे कारण म्हणजे शेवटी अब्रुनुकसानीचा दावा म्हणजे काय? माझी मानहानी झाली ती एवढ्या कोटीची आहे. संजय राऊतांची अब्रुनुकसानी एवढ्या रुपयांची नाही आहे. त्यामुळे त्यांनी थोडी रक्कम वाढवावी असा चिमटा चंद्रकांत पाटील यांना काढला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : संजय राऊतांनी सव्वा रुपयांची किंमत वाढवावी, चंद्रकांत पाटील यांचे प्रत्युत्तर


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -