ओला दुष्काळ घोषित करुन पंचनाम्यांशिवाय मदत जाहीर करा, चंद्रकांत पाटील यांची मागणी

भावना गवळी कितीकाळ पळापळ करणार

bjp leader chandrakant patil reaction on cm uddhav thackeray dussehra melava speech
मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये कशाचा कशाला धागाच जुळत नव्हता - चंद्रकांत पाटील

अतिवृष्टीमुळे मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. राज्य सरकारने अजून दुष्काळग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला नाही. विरोधी पक्षनेत्यांनी नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करण्यात यावी तसेच ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी राज्य सरकारमधील एकही नेता गेला नसल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसेच खासदार भावना गवळी यांच्या ईडी चौकशीवरुनही चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की, राज्य सरकारने मदत अद्यपही केली नाही. मदत लांब विचारपूस केली तरी आर्धे प्रश्न सुटतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अजूनही बाहेर पडले नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली त्यामुळे त्यांनी आवाज उठवला आहे. राज्य सरकारने ओला दुष्काळ केला पाहिजे. पंचनाम्यांशिवाय मदत जाहीर केली पाहिजे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो जीआर काढला आहे. त्या जी आरची अंमलबजावणी केली पाहिजे. त्या जीआरमुळे कोणत्याही शेतकऱ्याची मागणी शिल्लक राहणार नाही. यामुळे शेतकऱ्यांनीसुद्धा जीआर काढण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

भावना गवळी कितीकाळ पळापळ करणार

चंद्रकांत पाटील यांनी खासदार भावना गवळी यांच्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. गवळींना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते. परंतु भावना गवळी उपस्थित राहिल्या नाही. यावर चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की, आपला कायदा आपली घटना अशी सांगते की, ४ दोषी सुटले तरी चालतील पण एका निर्दोषाला शिक्षा होऊ नये यासाठी ही सोय आहे. त्या स्टेप्स टाळून एखाद्या एजन्सीने घाई केली तर ते तोंडावर पडतात, त्यामुळे त्यांचे उत्तम चाललं आहे. शेवटी एक काळ असा येईल जसं अनिल देशमुख यांच्याबाबतीत आला की कोर्टाने सांगितले की यांना अटक करा त्यामुळे कोडगेपणा बोलतात तसा हा कोडगेपणा झालेला आहे. त्यांच्या नेत्यांनीही आता हात वर केले आहेत. तुमचे तुम्ही निस्तरा असे सांगितले आहे.


हेही वाचा :  मोदी सरकार आणि योगी सरकार बरखास्त करा; नाना पटोलेंची मागणी