‘माजी मंत्री म्हणू नका’ या वक्तव्याचं चंद्रकांत पाटलांनी दिलं स्पष्टीकरण म्हणाले….

Chandrakant patil

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. देहूतील एका कार्यक्रमात चंद्रकात पाटील म्हणाले होते की, ‘माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसांत कळेल.’ यानंतर या वक्तव्याचे अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. पण आता चंद्रकांत पाटील यांनी स्वतः या वक्तव्या मागची गोष्ट सांगितली आहे. आज अनंत चतुर्दशी निमित्ताने त्यांनी पुण्यातील कसबा गणपतीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि हे वक्तव्य का केले याबाबत त्यांनी स्वतः खुलासा केला.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘प्रसंग असा आहे की, न्हावी समाजाचा काम करणारा एक तरुण माझ्या संपर्कात आला. मी त्याला चांगलं सलून उभं करून देण्याचं आश्वासन दिलं. देहूला तुझ्या सासरवाडीत सलून उभं राहिलं असं सांगितलं. त्याच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाला मी गेलो होतो. तिथे ग्रामीण भागात ज्याप्रमाणे माईकवरून घोषणा केली जाते, त्याप्रमाणे तेथे घोषणा सुरू होती की, माजी मंत्री यांनी पुढे यावे. मग मी म्हणालो, माझी काय म्हणतो, चार दिवसांनी ते आजी होतील. त्यात मला माजी मंत्री म्हणू नका असा विषय नाही. एवढ्या छोट्या गावात त्याची क्लिप केली आणि फिरवली. सामाजिक जीवनात एकदा तुमच्या नावाने बील लागलं की एकामागून एक घटना घडत असतात.’

पुढे पाटील म्हणाले की, ‘यानिमित्ताने खूप राजकीय चर्चा झाली. माझा कोणताही हेतू नव्हता की, मला माजी म्हणू नका. त्यामुळे एखाद्या विषयात जर तोटा नसेल त्यामुळे म्हटलं चालू द्या.’


हेही वाचा – भाजपातील त्या नेत्यांसाठी होते मुख्यमंत्र्यांचे संकेत – संजय राऊत