घरमहाराष्ट्रभाजप तिसरी जागा शंभर टक्के जिंकणार, चंद्रकांत पाटलांना विश्वास

भाजप तिसरी जागा शंभर टक्के जिंकणार, चंद्रकांत पाटलांना विश्वास

Subscribe

आज राज्यसभा निवडणुकी बद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये झालेल्या चर्चेबद्दल प्रतिक्रीया दिली. या वेळी आज महाविकस आघाडीचे नेते देवेंद्रजी आणि मी अशी तासभर चर्चा झाली. या चर्चेत असा प्रस्ताव होता की तुम्ही राज्यसभेची तीसरी जागा मागे घ्या आम्ही तुम्हाला एक विधानपरीषदेची जागा एक जास्त देऊ. आमचा प्रस्ताव असा होता की राज्यसभेची दुसरी जागा तुम्ही मागे घ्या आणि वीधान परिषदेची एक जागा आम्ही लढवणार नाही. त्यानंतर कोणताच संवाद झाला नाही. त्यानंतर फक्त बातम्या कानावर येत राहिल्या.मात्र, अधिकृत कोणीच बोलले नाही आणि आता साडेतीन वाजले त्यामुळे भाजप तिसरी जागा आवश्य शंभर टक्के लढवेल आणि जिंकेल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

पुरेसे संख्याबळ असल्याशीवाय निवडणुकीत आम्ही उतरत नाही. पुरेसे संख्याबळ त्यांच्याकडे ही नाही. काही कॉमन मतांसाठी दोघेजन प्रयत्न करणार शेवटी नेहमीच निवडणुकीच्या राजकराणामध्ये तुम्हाला प्रचंड मतानी विजयी झाल्यामुळे तुम्ही जरा जास्त वेटेजवाले खासदार होत नाही. तुम्हाला हवी तेवढी मते मिळाली की तुम्ही खासदार झाला. आमच्याकडे 30 मत आहेत. 41.01 असा कोटा आला आहे. 42 जरी धरली तरी आमच्याकडे 12 मत आहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे कोटा पद्धतीचे मतदान आहे. यात अनेक इतीहासातील दाखले आहेत की विरोधी उमेदवाराला पहिल्या क्रमांकाची मते जास्त होती.आमच्याकडे पहिल्या क्रमांकाची मते कमी होती. पण कोटापद्धत एका मताचे वेटेज वनटेन असे मोजन्याची पद्धत आहे. त्यामुळे आम्हाला विजयाची खात्री आहे. आम्ही ही जागा  विजयी होऊ.

- Advertisement -

आमचा संगळ्याशी संपर्क झालेला आहे – 

आमचा सगळ्याशी संपर्क झालेला आहे त्यामुळे आमदारांशी बैठका बोलवण्याची शक्यता नाही. इतर पक्षांच्या आमदाराच्या आम्ही बीलकुल संबंधात नाही. ती आमची कार्यपद्धत नाही आणि त्याचा उपयोग ही नाही. कारण पक्षाच्या आमदाराला त्यांच्या पक्षाच्या प्रतोदाला हे मत दाखवावे लागते जे अधिकृत आहेत. त्या व्यतिरित्कच्या मतांवर हे गणित जालणार आहे.पक्षाच्या मतदारानी जर संपर्क केला तर ते शक्य नाही.

- Advertisement -

ते दिवस गेले – 

कायदेशीर आडचणी आल्या तरी आमदार मतदान करणार असतील तर त्यांना आम्ही  मदत करायला नेहमीच तयार असतो. आमचा मानसाच्या सद विवेकबुध्दीवर विश्वास आहे. आता असे दिवस गेले की आमदारांना कोडून ठेवायचे आणि त्यांना दमदाटी करून मतदानाला आणायचे शेवटी के आमदार आहेत. त्यांना त्यांचे मत आहे जे करणार असतील त्यांचे प्रयत्न मतदानामध्ये रुपांतरीत होणार नाहीत.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -