घरमहाराष्ट्रपवारांच्या पे रोलवर राहू नका, शिवसैनिकांच्या व्यथा मांडाव्यात; चंद्रकांतदादांचा राऊतांना सल्ला

पवारांच्या पे रोलवर राहू नका, शिवसैनिकांच्या व्यथा मांडाव्यात; चंद्रकांतदादांचा राऊतांना सल्ला

Subscribe

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रानंतर शिवसेना-भाजप युतीबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. भाजपचे अनेक नेते युतीबाबत सकारात्मक भाष्य करत आहेत. मात्र, आज शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी अग्रलेखातून भाजपवर टीका केली. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना राऊतांना ल्ला दिला. पवारांच्या पे रोलवर न राहता शिवसैनिकांच्या खऱ्या व्यथा मांडा, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना दिला.

“शरद पवारांच्या पे रोलवर राहून उठसूट पवारांच्या समर्थनार्थ बोलण्यापेक्षा सर्वसामान्य शिवसैनिकाचं काय मनोगत ते तुम्हा मांडा. शिवसैनिकांचं मनोगत असं आहे की, आम्हाला हिंदुत्व पाहिजे. हिंदुत्वाच्या संरक्षणासाठी आम्ही आहोत. स्वर्गिय बाळासाहेब ठाकरे यांनी तो संदेश दिला आहे. महत्त्वाचं म्हणजे जी युती होती त्यात आम्ही समाधानी होतो. राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाणं हे अनैसर्गिक आहे, हे सर्वसामान्य शिवसैनिकाचं मत मांडत नाहीत,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

- Advertisement -

काही तरी घडल्याशिवाय कोणी त्रास देत नाही

प्रताप सरनाईक यांनी पत्रात केंद्रीय तपास यंत्रणांच्या मदतीने विनाकारण त्रास दिला जात असल्याचं म्हटलं आहे. संजय राऊत यांनी देखील तो आरोप केला आहे. यावर भाष्य करताना चंद्रकांत पाटील यांनी काही तरी घडल्याशिवाय कोणी त्रास देत नाही. काही तरी घडलं असेल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -