चंद्रकांत पाटील फार मोठे माणूस, त्यांच्यावर माझ्यासारख्या लहान व्यक्तींनी बोलणे योग्य नाही – अजित पवार

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार 10 मार्चला जाणार या चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पलटवार केलाय. चंद्रकांत पाटील हे फार मोठी व्यक्ती आहेत. त्या मोठ्या व्यक्तींबद्दल माझ्यासारख्या लहान व्यक्तींनी बोलणे योग्य नाही, असा उपरोधिक टोला अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना लगावलाय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते बोलत होते.

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार 10 मार्चला जाणार या चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पलटवार केलाय. चंद्रकांत पाटील हे फार मोठी व्यक्ती आहेत. त्या मोठ्या व्यक्तींबद्दल माझ्यासारख्या लहान व्यक्तींनी बोलणे योग्य नाही, असा उपरोधिक टोला अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना लगावलाय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते बोलत होते.

निधी वाटपाच्या मुद्द्यावर बैठक

1 फेब्रुवारीला जो केंद्राचा अर्थसंकल्प सादर झाला, त्याच्यावर आमचे काम सुरू आहे. साधारण समाजातील गरीब घटकाला कसा न्याय देता येईल आणि हा न्याय देत असताना राज्याची पुढची वाटचालही कशा पद्धतीने योग्य दिशेने जाईल, अशा प्रकारचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आमच्या महाविकास आघाडीचा राहील. प्रत्येक पक्षाच्या आमदारांना वाटत असते आपल्याला निधी मिळाला पाहिजे आणि त्यामध्ये समाधान कधीच कोणाचं होत नसतं.  कोरोनाचे सावट जगावर, देशावर तसेच, राज्यावर आहे. त्यामुळे त्याचा उत्पन्नावर परिणाम झालेला आहे. मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये हा सर्व रथ चालवायचा असतो आणि त्यामध्ये विकासकामात कुठलाही खंड पडता कामा नये. तिथेही कुठे अडचण येऊ नये, हा आमचा प्रयत्न असतो, असंही अजित पवारांनी सांगितलं.

राज्याच्या अर्थसंकल्पात गरीबांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न

राज्याच्या अर्थसंकल्पात गरीबांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. निधी वाटपाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे एकत्र बसून, एकत्र चर्चा करणार आहेत. काही गैरसमज झाले असतील तर, ते दूर करुन मार्ग काढू , मार्ग काढून काही समज गैरसमज झाले असतील कर ते दूर करु, असे अजित पवार म्हणाले आहेत. शिवसेना मंत्र्यांच्या निधीवरून त्यांचं काय मत असेल त्यावर मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे आम्ही एकत्र बसून चर्चा करू,आणि त्यावर मार्ग काढू. काही समज, गैरसमज झाले असतील तर दूर करू प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण सर्व मिळून आपण त्यांच्यावर मार्ग काढू असा मला विश्वास असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे.

12 आमदारांचे निलंबन मागे घेण्यात राज्य सरकारचा संबंध नाही

विधानसभेतील 12 आमदारांचे निलंबन मागे घेण्यात राज्य सरकारचा काही संबंध नाही, सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय आहे, त्याचं पालन करावं लागतंय, असेही यावेळी अजित पवार म्हणाले.

राहुल बजाज यांच्या निधनाने उद्योगक्षेत्रात खूप मोठी पोकळी निर्माण झाली 

बजाज परिवाराचं योगदान देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकंदरीत उभारणीमध्ये वाटचालीमध्ये उद्योगधंद्यांमधील मान्यावरांमध्ये जे काही योगदान आहे त्यामध्ये राहुल बजाज यांच योगदान खूप मोठं आहे. देशातील उद्योग क्षेत्रातील एक पितामह आहेत. त्यांनी एक्यपोर्टच्या निमित्ताने ज्या काही गोष्टी करुन दाखवल्या त्या प्रेरणादायी आहेत. त्यांचा स्वभाव स्पष्ट मत मांडण्याचा होता, असे अजित पवार म्हणाले.

त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. परंतु काळाच्या नियतीच्या पुढे कोणाचे काही चालतं नाही. मी त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि उद्योग क्षेत्रातला पितामह गेल्यामुळे उद्योगक्षेत्रात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पण त्यांची पुढची जनरेशनही या उद्योगक्षेत्रात यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करत असते. बरेच उद्योगपती मुंबई नाहीतर इतर ठिकाणी राहायला जातात.त्यांनी शेवटपर्यंत पुण्यामध्ये स्वत:च वास्तव्य ठेवलं, असे म्हणत अजित पवार यांनी आदरांजली अर्पण केली.


हे ही वाचा – शिवसेना, महाविकास आघाडी 15 फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेणार, भुंकायचे तेवढं भुंका; राऊतांचा विरोधकांवर हल्लाबोल