घरताज्या घडामोडी'सोमय्यांच्या हत्येचा प्रयत्न होता, चौकशी करावी', चंद्रकांत पाटलांचे अमित शाह यांना पत्र

‘सोमय्यांच्या हत्येचा प्रयत्न होता, चौकशी करावी’, चंद्रकांत पाटलांचे अमित शाह यांना पत्र

Subscribe

राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेवरुन प्रश्न उपस्थित केले आहेत. या एनआयएद्वारे चौकशी करुन या प्रकरणातील दोषींवर कारवाई करावी अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर पुणे दौऱ्यादरम्यान हल्ला करण्यात आला होता. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून सोमय्यांच्या गाडीचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. हा मॉब लिंचिंग करुन सोमय्यांची हत्या करण्याचा प्लान होता. याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्र लिहून केली आहे. सोमय्यांवर जाणीवपूर्वक कट रचून हल्ला करण्यात आला असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मॉब लिंचिंगचा कट रचून सोमय्यांवर हल्ला केला असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. सोमय्यांवर झालेला हल्ला हा जाणीवपूर्वक रचलेला कट होता असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला असल्यामुळे आता पुन्हा भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. चंद्रकांत पाटील यांनी आपल्या पत्रामध्ये काही मुद्दे मांडले असून जातीने लक्ष घालून चौकशी करण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

एनआयए चौकशी करावी

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याची एनआयए चौकशी करण्याची मागणी केली आहे. सोमय्यांना पोलिसांनी संरक्षण दिले नाही उलट ते या कटात सामील असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. तसेच हल्ल्यानंतर पोलिसांनी कमकुवत कलम लावून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना वाचवण्याचे काम केले असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. यावरुन पाटलांनी राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेवरुन प्रश्न उपस्थित केले आहेत. या एनआयएद्वारे चौकशी करुन या प्रकरणातील दोषींवर कारवाई करावी अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

सोमय्यांवर शिवसैनिकांकडून हल्ला

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या शनिवारी पुणे दौऱ्यावर होते. पुण्यातील कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार केल्याची तक्रार करण्यासाठी सोमय्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जात होते. यावेळी सोमय्यांच्या गाडीचा ताफा शिवसैनिकांनी अडवला असून दगडफेक केली. त्यानंतर सोमय्यांनी पुणे महानगरपालिकेत जाण्याचा प्रयत्न केला यावेळी शिवसैनिकांनी धक्काबुक्की केली. धक्काबुक्कीदरम्यान सोमय्या पायऱ्यांवर कोसळले होते. त्यांच्या सुरक्षा रक्षका सोमय्यांनी घेऊन पालिकेतून निघाले. सोमय्यांवर झालेला हल्ला हा जाणीवपूर्वक आणि कट रचून करण्यात आला असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : पुणे पालिका धक्काबुक्कीप्रकरणी किरीट सोमय्या केंद्रीय गृहसचिवांच्या भेटीला, पुणे पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -