‘हा’ विषय संपवावा लागेल, उदयनराजेंनी राज्यपालांच्या घेतलेल्या भूमिकेवरून पाटलांनी जोडले हात

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. परंतु उदयनराजे भोसले यांच्या या भुमिकेमुळे भाजपची राजकीय कोंडी झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी उदयनराजेंना थेट हात जोडूनच विनंती करत या प्रकरणावर पडदा टाकण्याचं आवाहन केलं आहे.

चंद्रकांत पाटलांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, ज्या राज्यपालांनी शिवनेरीवर पायी जाऊन छत्रपती शिवरायांचं दर्शन घेतलं, त्या राज्यपालांकडून चुकून काही शब्द निघाले असतील, मात्र आता आपल्याला हा विषय संपवावा लागेल, अशी मी हात जोडून उदयनराजेंना विनंती करतो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या मनात शिवरायांचा अनादर करण्याची भावना असूच शकत नाही. तशी भावना आमच्या कोणाच्याच मनात असणार नाही, असंही पाटील म्हणाले.

व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली सर्वांना अधिकार दिले आहे का?, शिवाजी महाराज किंवा थोर राष्ट्र पुरुषांचा अपमान करा? असा संतप्त सवाल खासदार उदयराजे भोसले यांनी केला, यासोबत छत्रपती शिवाजी महाराज आणि थोर पुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर देशद्रोहाच्या कायद्यानुसार कडक शिक्षा होण्यासाठी तसे कायदे केले पाहिजेत आणि अशा लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी देखील उदयराजे भोसलेंनी पुण्यात पत्रकार परिषदेत केली होती. दरम्यान, उदयनराजेंनी आज सातारा ते रायगड अशी शिवसन्मान यात्रा काढत राज्यपालांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.


हेही वाचा : महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना देशद्रोहाच्या कायद्यानुसार शिक्षा करा; उदयनराजे भोसलेंची