घरताज्या घडामोडीचंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंना भेट दिलं प्रबोधनकारांचं पुस्तक, करून दिली 'त्या' वादाची आठवण

चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंना भेट दिलं प्रबोधनकारांचं पुस्तक, करून दिली ‘त्या’ वादाची आठवण

Subscribe

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपुरात विधान भवनाला भेट दिली. तसेच आमदारांसोबत बैठकही घेतली. यावेळी भाजपचे आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर प्रबोधनकार ठाकरेंचं माझी जीवनगाथा हे पुस्तक उद्धव ठाकरेंना भेट म्हणून दिलं. त्यावेळी त्यातील एका वादाची आठवण चंद्रकांत पाटलांनी त्यांना करुन दिली. यासंदर्भात आता चर्चेला सुरूवात झाली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनीही शाळा सुरु केल्या. मात्र शाळा सुरु करताना सरकारने त्यांना अनुदान दिलं नाही. तर त्यांनी लोकांकडे भीक मागितली, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं. या वादग्रस्त वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटलांविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

- Advertisement -

पिंपरी येथील एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईदेखील फेकण्यात आली. त्यानंतर त्यांनी माफीही मागितली होती. दरम्यान, या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे यांनी तीव्र शब्दांत टीका देखील केली होती. एका मंत्र्याने भीक शब्द वापरून बौद्धिक दारिद्र्य दाखवून दिल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती.

भीक मागणं हा उल्लेख प्रबोधनकारांनीही त्यांच्या पुस्तकात केल्याचं चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. आपण वापरलेल्या शब्दांमध्ये काही गैर नव्हतं. हे पटवून देण्यासाठी चंद्रकांत पाटलांनी प्रबोधनकारांच्या पुस्तकाचा संदर्भ उद्धव ठाकरेंना वाचून दाखवला. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे तसेच आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांचीही उपस्थिती होती.

- Advertisement -

हेही वाचा : राज्यात लवकरच लव्ह जिहादविरोधी कायदा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे संकेत


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -