तुम्ही सांगाल तो इतिहास का? चंद्रकांत पाटलांचा आव्हाडांना सवाल

'तुमचं सरकार गेलं हे सहन होत नाही म्हणून रोज काही न काही संघर्ष करत आहात'.

chandrakant patil

हर हर महादेव (har har mahadev) या चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (jitendra avhad) यांनी केला. ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड आणि हाणामारी केली. त्यावरूनच जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी अटक केली होती. एकूणच या सर्व प्रकरणावर राजकीय वर्तृळातुन प्रतिक्रिया येत आहेत. अशाच भाजपाचे चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनीही जितेंद्र आव्हाड यांना उद्देशून ‘जर तुम्ही कायदा हातात घेतल्यावर जी शिक्षा व्हायची ती होणार’ असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

‘तुमचं सरकार गेलं हे सहन होत नाही म्हणून रोज काही न काही संघर्ष करत आहात. भारताने सगळ्या प्राकाराच्या विचार सरणीला पचवलं हेच भारताचे वैशिट्य आहे. जर तुम्हाला एखादा सिनेमा (cinema) किंवा कथा आवडली नाही तर तसे बोर्ड गळ्यात लावून तुम्ही उभे रहा लोकांना त्याला प्रतिसाद द्यावासा वाटला तर ते देतील. चित्रपट गृहात प्रेक्षक सिनेमा बघत असताना तुम्ही त्यांना हुसकवता कसे?’ असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी उपथित केला. ‘तुम्ही कायदा हातात घेतल्यावर जी शिक्षा व्हायची ती होणार’ म्हणत चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला.

हे ही वाचा –   गजानन कीर्तिकरांनी शिंदे गटात प्रवेश केला तरी मुलगा अमोल कीर्तिकर ठाकरेंसोबतच!

जितेंद्र आव्हाड यांना अटक झाल्या नंतर जयंत पाटील यांनी सुद्धा माध्यमांना प्रतिक्रिया दिली यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘तुम्ही म्हणाल तो इतिहास आहे का? प्रत्येकाला जो इतिहास काळाला, प्रत्येकाच्या भावविश्वाला जे भावलं त्यानुसार ते मांडणार. ही काही हुमशाही आहे का आहे’ असा टोला सुद्धा चंद्रकांत पाटलांनी जितेंद्र आव्हाडांना लगावला आणि ही दादागिरी चालणार नाही असंही ते म्हणाले.

याच संदर्भांत चंद्रकांत पाटील म्हणाले ‘चित्रपटात काय दाखवायचं याच पूर्ण स्वातंत्र्य चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखकाला आहे’ असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

हे ही वाचा –  छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विकृतीकरण सहन करणार नाही – जयंत पाटील