घरताज्या घडामोडीभाजप - मनसे एकत्रिपणे निवडणूका लढवण्याचा प्रस्ताव नाही - चंद्रकांत पाटील

भाजप – मनसे एकत्रिपणे निवडणूका लढवण्याचा प्रस्ताव नाही – चंद्रकांत पाटील

Subscribe

राज ठाकरे यांनी परप्रांतीयांबाबतची भूमिका बदल्याशिवाय त्यांच्यासोबत चर्चा करु शकत नाही.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे मनसे -भाजप युती होणार अशी चर्चा रंगली होती. परंतू चंद्रकांत पाटील यांनी या चर्चांचे खंडन केलं आहे. भाजप-मनसे युतीबाबत कोणताही प्रस्ताव नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच राज ठाकरे यांच्या परप्रांतीयांच्या भूमिकेबाबत काही प्रश्न होते यासाठी ही भे झाली आहे. नाशिक दौऱ्यादरम्यान राज ठाकरे यांनी निमंत्रण दिले होते. परप्रांतीयांच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचे मन वळवण्याचा प्रयत्न केला असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नाशिकला अचानक भेट झाली, ते नाशिक दौऱ्यावर होते त्यावेळी राज यांनी घरी येण्याचे निमंत्रण दिले होतं, पहिला मुद्दा असा उपस्थित होतो की भाजपचे प्रदेशाध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी का गेले? त्यांना भाजप प्रदेश कार्यालयात का बोलावले नाही? तर मी मुळात अहंकारी नाही, भाजपची परंपरा आणि संस्कृती आहे की, कोणीही बोलावले तर आपण येतो असे बोलतो. याच्यामध्ये कोणी कोणाच्या घरी जायचे हा विषय आपला आहे. अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

- Advertisement -

राज यांच्या भूमिकेविषयी प्रश्न

नाशिकमध्ये झालेल्या भेटीमध्ये त्यांनी निमंत्रण दिले की घरी या, या निमंत्रणानुसार त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. राज ठाकरे यांनी परप्रांतीयांबाबतची भूमिका बदल्याशिवाय त्यांच्यासोबत चर्चा करु शकत नाही. त्यात त्यांनी एक क्लिप भाषणाची दिली होती. ही क्लिप उत्तर भारतीयांसमोर भाषण केलं होते ते उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये बरेच व्हायरल झालं होते. ते भाषणा ऐकण्यासाठी राज ठाकरेंनी म्हटलं होते. ती क्लिप ऐकल्यानंतर मनात काही मुद्दे उपस्थित झाले त्या मुद्द्यावर चर्चा झाली असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

या भेटीमध्ये राजकीय चर्चा ही युतीची नाही तर राजकीय चर्चा ही भूमिकांची आहे. दोन भूमिका या कुठल्याही माणसांच्या असतात एक माणूस म्हणून आणि एक कार्यकर्ता म्हणून तर दुसरी एक माणूस म्हणून आणि एक नेता, यामुळे माणूस म्हणून त्यांच्यासोबत मला चर्चा करायची होती. ज्यावेळी मी सिद्धार्थमध्ये विद्यार्थी असताना विद्यार्थी परिषदेचं एबीव्हीपी काम करत होतो त्यावेळी राज ठाकरे बीव्हीएसचे काम करायचे. तेव्हापासून माझ्यामनात नेहमी आकर्षण राहिले आहेत. त्यांची भूमिका, बोलणं, बोलण्याची पद्धत आणि आपल्या मुद्द्यावर आग्रही राहणे असे मला आकर्षण होते.

- Advertisement -

युतीबाबत कोणताही प्रस्ताव नाही

राज ठाकरे तुम्ही भूमिका बदला, तुम्ही राज्याचे नेते झाले पाहिजेत मात्र मनसेची राज्यातील परिस्थिती पाहता थोडा कालावधी लागेल यासाठी मोठ्या समूहात यायला पाहिजे. असे माणूस म्हणून त्यांना सागणे हा भाग वेगळं आहे. मात्र मी भाजप प्रदेशाध्यक्ष आहे. यामुळे आज या घडीला तरी भाजप-मनसे युतीबाबत कोणताही प्रस्ताव नाही. असे स्पष्ट शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांच्या भेटीनंतर नमूद केलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -