घरताज्या घडामोडीतुम्ही दरोडा घालायचा आणि पोलिसांनी तुमचे स्वागत करायचं का?, चंद्रकांत पाटलांचा देशमुखांना...

तुम्ही दरोडा घालायचा आणि पोलिसांनी तुमचे स्वागत करायचं का?, चंद्रकांत पाटलांचा देशमुखांना सवाल

Subscribe

शिवसेनेला प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी बोट धरुन मराठवाडा आणि विदर्भात नेलं आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावाई गौरव चतुर्वेदी यांनी सीबीआयनं ताब्यात घेतलं होते. गौरव चतुर्वेदी यांना नोटीस न देता चौकशी केल्यामुळे महाविकास आघाडी सरकारकडून टीका करण्यात येत आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अनिल देशमुख यांना सवाल केला आहे. तुम्ही दरोडा घालायचा आणि पोलिसांनी तुमचे स्वागत करायचं का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसला असल्याचे म्हटलं आहे. देशमुखांची संपत्ती उगच जप्त होते आहे का? असाही सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अनिल देशमुख यांच्या जावयावर करण्यात आलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. अनिल देशमुख यांना क्लिन चिट मिळाली की नाही याची चौकशी सुरु आहे. तुम्ही दरोडा घालायचा आणि मग तुम्ही पोलिसांना अटक करायची नाही का?, तुमचे हार घेऊन स्वागत करायचं का? या या उत्तम दरोडा घातला असे म्हणायचं का? सीबीआयनं काय करावं, न करावं हा माझा विषय नाही. अनिल देशमुख यांची संपत्ती धडधड जप्त होते आहे. मग उगाच जप्त होत आहे का? असे प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केले आहेत.

- Advertisement -

शिवसेनेला बोट धरुन विदर्भात नेलं

चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसला असल्याचा पुनरुच्चार केला आहे. शिवसेना केवळ मुंबईत होती, शिवसेनेला बोट धरुन विदर्भात भाजपने नेलं आहे. आता आम्हाला स्वबळावर लढायचं आहे. राज्यात १८० जागा लढण्यावर भाजप भर देत आहे. आम्हाला पुन्हा फसवलं जायचं नाही असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेना फक्त मुंबईत होती. शिवसेनेला प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी बोट धरुन मराठवाडा आणि विदर्भात नेलं आहे. तुम्ही ५६ वर मुख्यमंत्री झाला आणि १०५ वाल्यांना बाय बाय केलं त्यामुळे आम्हाला कोणासोबत लढायचं नाही असे चंद्रकांत पटील यांनी म्हटलं आहे.

अरविंद सावंतांनी मुंबईत जिंकून दाखवावं

महाविकास आघाडीकडून आमच्या पोटात दुखत असल्याचे वारंवार म्हटलं जात आहे. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्याकडूनही असेच वक्तव्य केलं जात आहे. आगामी निवडणुकीत अरविंद सावंत यांनी भाजपशिवाय मुंबईत लोकसभा निवडणूक जिंकून दाखवावं असं आव्हानच चंद्रकांत पाटील यांनी अरविंद सावंत यांना दिलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : CBI ने आपल्याच अधिकाऱ्याला केली अटक, रिपोर्टमध्ये छेडछाड केल्याचा आरोप


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -