घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनक्षलवाद्याची कीड समाजातून उखडून फेकली पाहीजे, चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया...

नक्षलवाद्याची कीड समाजातून उखडून फेकली पाहीजे, चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया…

Subscribe

गडचिरोली पोलिसांच्या कारवाईवर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया...

मी महाराष्ट्र पोलिसांचं खूप मनापासून अभिनंदन करतो. माझा उर अभिमानाने भरून आला आहे. नक्षलवाद्याची कीड समाजातून समूह उखडून फेकली पाहीजे. कारण ज्या काळामध्ये विकास नव्हता. त्या काळामध्ये आदीवासींना भडकवण्याची कामे सुरू होती. परंतु आता विकास सुरू झाल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारकडून वठणीवर आणलं गेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये केवळ व्यक्तीगत स्वार्थासाठी खंडणी वसूल करण्यासाठी अशी चळवळ सुरू ठेवणं बरोबर नाहीये. त्यांनी शरण येऊन सामान्य माणसांसारखं जीवन जगलं पाहीजे, अशी केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भावना असते. त्यामुळे त्यांना जशासतसे उत्तर दिल्यामुळे मी महाराष्ट्र पोलिसांचं अभिनंदन करतो. अशा प्रकारची प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गडचिरोली पोलिसांच्या कारवाईवर दिली आहे.

नक्षल्यांचा म्होरक्या मिलिंद तेलतुंबडेचा खात्मा

महाराष्ट्र छत्तीसगढ सीमेलगत असणाऱ्या ग्यारापत्ती जंगल परिसरात सी-६० पोलिसांशी झालेल्या चकमकीत ६ महिला आणि २६ नक्षलवादी ठार झाल्यामुळे नक्षलवाद्यांना मोठा धक्का बसला आहे. सुमारे चार तास सुरू असलेल्या या चकमकीत नक्षलवाद्यांचा म्होरक्या मिलिंद तेलतुंबडेदेखील ठार झाला आहे. गडचिरोली पोलिसांनी या माहितीला दुजोरा दिला असून तीन पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. त्यानंतर जखमी पोलिसांना तात्काळ हेलिकॉप्टरच्या सहाय्याने नागपूर येथे हलवण्यात आले आहे.

- Advertisement -

मिलिंद तेलतुंबडे हा कुख्यात माओवादी नेता होता. त्याचा शोध घेण्यासाठी आणि पकडण्यासाठी तब्बल ५० लाखांचे बक्षीस देखील ठेवण्यात आले होते. पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी जंग जंग पछाडले होते. परंतु हा म्होरक्या खूप हुशार आणि चाणाक्य असल्यामुळे तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. परंतु चार तास सुरू असलेल्या या चकमकीत २६ नक्षलवाद्यांसह मिलिंद तेलतुंबडेदेखील ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पालकमंत्र्यांनी केलं पोलिसांचं कौतुक

गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस दलाच्या धाडसी कामगिरीचे कौतुक केले आहे. विकासाला अडथळा आणणाऱ्या नक्षली कारवायांचा शासन कठोरपणे बिमोड करेल. शरणागती पत्करून मुख्य प्रवाहात येऊ इच्छिणाऱ्या नक्षलवाद्यांच्या पुर्नवसनासाठी शासनाचं धोरण आहे. त्यामुळे हिंसेचा मार्ग सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात नक्षलवाद्यांनी यावं, असं आवाहन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

- Advertisement -


हेही वाचा: अभिनेत्री शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांच्या अडचणीत मोठी वाढ ; व्यावसायिकाकडून फसवणुकीचा गुन्हा दाखल


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -