घरताज्या घडामोडीदेशमुखांनी ईडीला पुरावे गोळा करण्यासाठी पुरेसा वेळ दिल्याने अटक, चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य

देशमुखांनी ईडीला पुरावे गोळा करण्यासाठी पुरेसा वेळ दिल्याने अटक, चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य

Subscribe

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने सोमवारी रात्री उशीरा अटक केली आहे. १०० कोटी खंडणी प्रकरणात ईडीने अनिल देशमुख यांना अटक केली आहे. अनिल देशमुखांना चौकशीसाठी ईडीने ५ वेळा बोलवले होते परंतु अनिल देशमुख हजर राहिले नाही. या काळात अनिल देशमुख यांनी ईडीला पुरेसा वेळ दिला असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. अनिल देशमुखांना सर्व दरवाजे बंद झाल्यामुळे चौकशीला हजर रहावे लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात कोणतीही चुक माफ होणार नाही मग ती भाजपचीही असो दोषींवर कारवाई होणार असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनिल देशमुख यांचे सर्व दरवाजे बंद झाल्यामुळेच ईडीच्या चौकशीला हजर राहिले. त्यांनी ईडीला कारवाई करण्यासाठी आणि त्यांच्याविरोधात पुरावे गोळा करण्यासाठी पुरेसा वेळ दिला. पण ते सुद्धा प्रयत्न करत होते. कोणत्या ना कोणत्या मार्गाने अटकपूर्व मिळेल का? पण मी काल सांगितले होते ते हजर झालेत त्याप्रमाणे सर्व दरवाजे बंद झालेले दिसत आहे. त्यामुळे आता अटक झाली आहे. सीबीआय आणि ईडी चौकशी करेल. त्यातून जे निष्पन्न होईल ते होईल असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

- Advertisement -

आपला कायदा असं सांगतो की एखाद्या निष्पाप माणसाला अटक होऊ नये त्यामुळे तो दोषी आहे. त्याच्याविरुद्ध पुरावे आहेत असं होईपर्यंत त्याला अटक करु नये. असं असेपर्यंत त्याला त्रास देऊ नये मात्र देशमुख ईडीच्या चौकशीला यापुर्वी हजर राहिले नाही. ईडीला अधिक वेळ पुरावे गोळा करण्यासाठी मिळाला यामुळेच ही अटक झाली.

मोदींच्या काळात चूक माफ होणार नाही

मोदींच्य काळात कोणत्याही नेत्याची चूक माफ होणार नाही असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. या देशात जेव्हापासून मोदी पंतप्रधान झाले आहेत. तेव्हापासून चल जायेगा आणि ढल जायेगा असं होणार नाही. मग तो भाजपचा कार्यकर्ता असो किंवा शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचा नेता असो मोदींच्या काळात कोणाचीही चूक माफ होणार नाही. त्यामुळे जे दोषी आहेत ते तुरुंगात जाणार असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

- Advertisement -

अनिल देशमुखांना अटक

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडीच्या चौकशीला सामोरे जात नव्हते. मागील ४ ते ५ महिन्यांपासून देशमुख अज्ञातवासात होते. सोमवारी अनिल देशमुख ईडीच्या चौकशीसाठी हजर झाले. तब्बल १३ तासाच्या चौकशीनंतर अनिल देशमुखांना रात्री उशीरा अटक केली. माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुखांवर १०० कोटी रुपये खंडणी गोळा करण्यासाठीचे आदेश दिले असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची चौकशी ईडीकडे सुरु आहे.


हेही वाचा : मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -