घरताज्या घडामोडीफडणवीसांना पाठवलेल्या नोटिशीवर स्थगन प्रस्ताव आणणार, चंद्रकांत पाटील यांची माहिती

फडणवीसांना पाठवलेल्या नोटिशीवर स्थगन प्रस्ताव आणणार, चंद्रकांत पाटील यांची माहिती

Subscribe

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बदली अहवाल लीक प्रकरणात मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस पाठवली होती. यानंतर मुंबई पोलिसांनी फडणवीसांची सागर बंगल्यावर २ तास कसून चौकशी केली. भाजप नेत्यांनी याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून आज विधानसभेत स्थगन प्रस्ताव आणणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. आमदार आशिष शेलार हा प्रस्ताव आणतील असे चद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या नोटिशीवरुन विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी घोषणाबाजी केली. तसेच ठाकरे सरकारचा निषेध करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आलेल्या नोटीशीवर आमदार आशिष शेलार स्थगन प्रस्ताव आणतील अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलतना दिली आहे. चोर सोडून सन्यासाला शिक्षा आहे. देवेंद्र फडणवीसांनी अशा प्रकारच्या बदल्यांमधील भ्रष्टाचाराची माहिती बाहेर काढल्याबद्दल त्यांना सहआरोपी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. याविरोधात सभागृहात आवाज उठवणार असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.

- Advertisement -

अजित पवारांचा राज्य सरकारला घरचा आहे नाही – पाटील

सुतावरुन स्वर्ग गाठण्याचे कारण नाही अजित पवारांचा हा स्वभाव आहे. ते खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला नाही तर त्यांनी जे काही चालले आहे त्यावर नाराजी व्यक्त केली आहे. अजित पवारांसारखे अनेक व्यक्ती आहेत ज्यांनी बोवलण्यास सुरुवात केली नाही. आता नवाब मलिकांचा राजीनामा एखादा सरकारी नोकर अटक झाल्यानंतर त्याला २४ तासात सस्पेंड करावे लागते. मात्र ३० दिवस झाले तरी अद्याप नवाब मलिकांचा राजीनामा घेण्यात आला नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नवाब मलिकांच्या फाईल्सवर सही कोण करतं? जेलमध्ये फाईल्स सही होतात का? कीमान खातं तरी दुसऱ्याकडे दिले पाहिजे असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

सत्ताधाऱ्यांना नोटीस खारीज करता आली नाही 

केंद्राची नोटीस आल्यानंतर तुम्ही कोर्टात जायचे आणि नोटीस खारीज करायची पण तुम्हाला ते करता आले नाही. उलट गिरीश महाजन यांना मोक्काची नोटीस मिळाली त्यांनी ती खारीज करुन घेतली. प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांनी स्टे मिळवला पंरतु यांच्यात दमच नाही. नवाब मलिकांना अटक ईडीने केली नाही, सीबीआयने केली नाही. न्यायालयाने नवाब मलिकांना अटक सुनावली आहे. मोदी परवा म्हणाले आहेत की, विरोधकांचा न्यायालयावरुन विश्वास उडाला आहे. असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा : Devendra Fadnavis : दुसरा व्हिडिओ बॉम्ब आणखी स्ट्रॉंग, चंद्रकांत पाटील यांची फडणवीस चौकशीवर प्रतिक्रिया

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -