घरताज्या घडामोडीओबीसी आरक्षणासाठी भुजबळ यांनी राज्य सरकारविरोधात संघर्ष केला पाहिजे - चंद्रकांत पाटील

ओबीसी आरक्षणासाठी भुजबळ यांनी राज्य सरकारविरोधात संघर्ष केला पाहिजे – चंद्रकांत पाटील

Subscribe

ओबीसी समाजाबाबत भाजपच्या मनात खोट नाही तर त्यांच्याबाबत प्रेम, श्रद्धा आहे.

ओबीसी समाजासाठी भाजपने १२ आमदारांचा त्याग केला आहे. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी स्वतःला अटक करुन घेतली. ५ जिल्ह्यांच्या निवडणूका लागल्या तेव्हा सर्व जागांवर ओबीसी उमेदवार देणार अशी घोषणा देखील केली. महाराष्ट्रात १ हजार ठिकाणी अटक करुन घेतली आहे. भुजबळ यांनी त्यांच्या सरकारविरोधात संघर्ष केला पाहिजे असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ओबीसी राजकीय आरक्षणासाठी भाजपकडून ओबीसी जागर अभियान करण्यात येत असल्याचे भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की, जर भुजबळ यांचे म्हणणे खरे आहे की, केंद्रान इम्पेरिकल डेटा द्यावा तर ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कशाला गेले होते. ते फडणवीस यांना भेटायला गेले तेव्हा म्हणाले की, आम्हाला पटतंय की ही राज्याची जबाबदारी आहे तर कसे कसे करुया संगा असे भुबळ यांनी फडणवीसांना विचारले असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

ओबीसी जागर अभियान

ओबीसीचे राजकीय आरक्षण राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेले आहे. ते आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी जो संघर्ष सुरु आहे त्यात लोकांपर्यंत नीट पोहोचवण्यासाठी ओबीसी जागर अभियान करायचे आहे. ओबीसी राजकीय आरक्षणामध्ये अल्पसंख्यांक मंत्री छगन भुजबळ, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे आरक्षणाच्या मुद्द्यावर खोटं प्रस्थापित करुन समाजाची दिशाभूल करत आहेत. मराठा आरक्षण देण्याचे भाजपने धाडस केलं आहे. त्यावेळी मराठा आरक्षण तर देऊ परंतु ते देताना ओबीसी आरक्षणाला हात लावणार नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ते व्यवहारात आणलं वेगळ एसईबीसी आरक्षण दिले. ते आरक्षण हायकोर्टात, सर्वोच्च न्यायालयात टिकवले परंतू या नाकर्ते राज्य सरकारला ते टिकवता आले नाही.

त्यामुळे ओबीसी आरक्षणाबद्दल भाजपच्या मनामध्ये खोट असेल तर मराठ्यांना खुश करण्यासाठी हे म्हणता आले असते की, मराठा समाज ओबीसी केला की, त्यांना ओबीसी आरक्षणात जोडू कुन्बींच्या बरोबर, पण ३२ टक्के मराठा समाज आहे जर हा समाज ओबीसीमध्ये आला असता त्याचे काय परिणाम झाला असता हे सगळ्यांना माहिती आहे. ओबीसी समाजाबाबत भाजपच्या मनात खोट नाही तर त्यांच्याबाबत प्रेम, श्रद्धा आहे. ओबीसी समाजाला परंपरागत उद्योगातून वर काढायचा असेल तर त्याला इतर समाजाला न्याय देताना या समाजावर अन्याय होऊ नये याची काळजी घेतली आहे. असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -