घरताज्या घडामोडीसंभाजीराजे छत्रपतींच्या आंदोलनाच्या घोषणेचे स्वागत, भाजप आरक्षणासाठी पाठिंबा देणार - चंद्रकांत पाटील

संभाजीराजे छत्रपतींच्या आंदोलनाच्या घोषणेचे स्वागत, भाजप आरक्षणासाठी पाठिंबा देणार – चंद्रकांत पाटील

Subscribe

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार जरी असतील तरी त्यांच्या पाठी आम्ही उभे राहणार - चंद्रकांत पाटील

मराठा आरक्षणावर खासदा संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारला ६ जूनपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले होते. परंतु राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट न केल्यानं येत्या १६ जून रोजी कोल्हापुरातून मराठा मोर्चाला सुरुवात करणार असल्याची घोषणा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजेंच्या घोषणेचं स्वागत करत आमचा राजेंच्या आदोलनाला सामान्य नागरिक म्हणून संपुर्ण पाठिंबा असेल असे म्हटले आहे. भाजपचा झेंडा किंवा कार्यकर्ता अशी ओळख न दाखवून सामान्य नागरिकाप्रमाणे पाठीशी राहू असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्याचा आजचा दिवस खुप महत्त्वाचा असतो. रायगडावर खूप मोठ्या संख्येने लोकं शिवाजी महाराजांना वंदन करण्यास जात असतात. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणावरुन अल्टिमेटम दिलं होते. परंतु राज्य सरकारने काही केलं नाही. त्यामुळे १६ जूनपासून कोल्हापुरातून मोर्चा काढण्यास सुरुवात करणार अशी घोषणा संभाजीराजे यांनी केली आहे. संभाजीराजे छत्रपती आमचे नेते आहेत. त्यांच्या घोषणेचे स्वागत करतो असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

भाजपने वारंवार म्हटले आहे की, स्वतःचा झेंडा हाती घेणार नाही रस्त्यावर उतरणार नाही. परंतु जे कोणी मराठा समाजाला लवकर आरक्षण मिळण्यासाठी आणि आरक्षण मिळेपर्यंत सवलती मिळवून देण्यासाठी काम करतील आणि ते राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार जरी असतील तरी त्यांच्या पाठी आम्ही उभे राहणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. संभाजीराजे भाजपचे नेते आहेत, शाहु महाराजांचे वंशज आहेत. पण त्यांना आमचे सहकार्य हवे असल्यास त्यांच्या पाठीशी आहोत असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

संभाजीराजे छत्रपतींची आंदोलनाची घोषणा

संभाजीराजेंनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर आपली ठोस भूमिका सरकारसमोर मांडली आहे. मराठा आरक्षणाच्या पहिल्या मोर्चाला छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळापासून सुरुवात होणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. मागण्या मान्य न झाल्यास १६ जूनपासून आंदोलन करणार असल्याची घोषणा संभाजीराजे यांनी किल्ले रायगडावरुन केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, १६ जूनला पहिला मोर्चा काढणार- संभाजीराजे


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -