घरताज्या घडामोडीSt worker strike : एसटी डेपोच्या जमिनी लाटण्यासाठी संप लांबवला जातोय, चंद्रकांत...

St worker strike : एसटी डेपोच्या जमिनी लाटण्यासाठी संप लांबवला जातोय, चंद्रकांत पाटलांचा आरोप

Subscribe

. मुख्यमंत्र्यांना अशी विनंती आहे हे तुम्हाला नाही कळत आहे. तुम्ही अशा कधी जमीनी लाटल्या नाही आहेत हे जमीन लाटण्यासाठी चालले आहे हे तुम्हाला नाही कळणार असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप गेल्या २ महिन्यांपासून सुरुच आहे. एसटीचे शासकीय सेवेत विलिनीकरण करण्यात यावे अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे. पंरतु कर्मचाऱ्यांच्या मागणीवर अद्याप तोडगा निघाला नसल्यामुळे हा संप अद्यापही सुरुच आहे. महाविकास आघाडी सरकारमधील काही नेत्यांची एसटी डेपोच्या जमिनीवर नजर असून तो भूखंड लाटण्यासाठी एसटी संपावर तोडगा काढण्यात येत नाही आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हे समजत नाही आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे कधी भूखंड लाटले नाही असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी चंद्रकांत पाटलांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर राज्य सरकारवर घणाघात केला आहे. तसेच राज्य सरकारमधील मंत्र्यावर गंभीर आरोपही केले आहेत. चंद्रकांत पाटील म्हणाले की, सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा सुरु करतो असे म्हणा ते लगेच तुमच्याकडे काही मागत आहेत का? या सरकारला एसटीचे नेटवर्क मोडून काढायचे आहे. कोणत्यातरी प्रायव्हेट वाहतूक वाल्यांशी त्यांचे कंत्राट झाले आहे. हे सगळे मोठे डेपो त्यांना विकायचे आहे. जमीनीवर डोळा असणारेच आहेत. मुख्यमंत्र्यांना अशी विनंती आहे हे तुम्हाला नाही कळत आहे. तुम्ही अशा कधी जमीनी लाटल्या नाही आहेत हे जमीन लाटण्यासाठी चालले आहे हे तुम्हाला नाही कळणार असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

- Advertisement -

बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला न आवडणारे

कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. यामध्ये चंद्रकांत पाटील यांनी उदाहरण दिलं, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा अशी होती की, जर अन्याय झालेली स्त्री तर तक्रार घेऊन आली तर ते म्हणायचे चला जाऊन बघा इथे तर ७० ते ८० हजार कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला आहे. हे महाराष्ट्राला आणि बाळासाहेब ठाकरेंना त्यांच्या आत्म्याला न आवडणारे आहे. असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.


हेही वाचा : पालिका निवडणुकीच्या तोंडावर महत्त्वाच्या पदांवरील अधिकाऱ्यांच्या बदल्या, बढत्या

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -