घरताज्या घडामोडीराष्ट्रवादी पक्ष भरवशाचा पक्ष नाही, काँग्रेस नेते मात्र वेल कल्चर, चंद्रकांत पाटलांचा...

राष्ट्रवादी पक्ष भरवशाचा पक्ष नाही, काँग्रेस नेते मात्र वेल कल्चर, चंद्रकांत पाटलांचा टोला

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष भरवशाचा नाही. पण काँग्रेस नेते वेल कल्चर असतात ते दरोडेखोर नसतात असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस विदर्भ मराठवाड्यामध्ये सलगी करण्यास पाहत आहेत. परंतु त्यांच्या डावाला भाजप भुलणार नाही असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडी सरकारने यापुर्वी सचिन वाझेचे समर्थन केलं मग परमबीर सिंह यांचे केले आता ते म्हणतात भाजपचे पोपट आहेत. महाविकास आघाडीतील नेत्यांना बाबासाहेब आंबेडकर यांची घटनाच मान्य नाही असा घणाघात चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघात केला आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी ही कधीच भरवशाचा पक्ष नाही. सकाळी एक राजकारण, दुपारी एक राजकारण आणि संध्याकाळी एक राजकारण, काँग्रेस एकवेळेस परवडली. काँग्रेसमधील सगळी व्यक्तीमत्व ही वेल कल्चर असतात ती दरोडेखोर नसतात त्यामुळे राष्ट्रवादीनं सलगी करणं याला भाजप भुलणार नाही. राष्ट्रवादीच्या सलगी करणं या डावाला भाजप भुलणार नाही असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

- Advertisement -

मविआला घटनाच मान्य नाही

महाविकास आघाडी सरकारने आधी वाझेचे समर्थन केलं, मग म्हणाले वाझे भाजपचे आहेत. परमबीर सिंहांकडून सगळं करुन घेतलं आता म्हणतात परमबीर भाजपचे आहेत. आता वानखेडे भाजपचे पोपट आहेत. मग हायकोर्ट भाजपचे आहे कारण हायकोर्टाने जामीन नाकारला, तुम्ही निर्दोष असता तर दोन मिनटांत जामीन मिळाला पाहिजे २६ दिवस का लागले याचा अर्थ त्या केसमध्ये तथ्य आहे. मग हायकोर्ट, निवडणूक आयोग, सीबीआय पक्षपाती करत आहेत असे म्हणतायत यांना बाबासाहेब आंबेडकरांची घटनाच मान्य नाही.

टेंडर रद्द हा भाजपचा विजय

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या जावयाला १५०० कोटी रुपयांचे कंत्राट दिलं होते. महाविकास आघाडीने गेल्या दोन वर्षात वेगवेगळ्या विभागात वसुली केली आहे, आताच एका मंत्र्याच्या जावायला १५०० कोटी रुपयांचे टेंडर दिलेलं रद्द केलं आहे. माजी खासदार किरीट सोमय्या आणि भाजपचा हा विजय असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा :  गृह खातं तुमच्याकडे काय करायचे ते करा, चंद्रशेखर बावनकुळेंचं नवाब मलिकांना आव्हान


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -