घरताज्या घडामोडीदेशाचे‘विनोदरत्न' राहुल गांधी यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, चंद्रकांत पाटलांची घणाघातील टीका

देशाचे‘विनोदरत्न’ राहुल गांधी यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, चंद्रकांत पाटलांची घणाघातील टीका

Subscribe

महाराष्ट्राचेच दुर्भाग्य की त्याला आजच्या कठीण काळात अशा संकुचित विचारांचे सरकार मिळाले

सध्या कोरोनाची लागण झालेले कॉंग्रेसेचे नेते व देशातील एकमेव राजकीय विनोदरत्न राहुल गांधी यांच्या डोक्यावर सध्या परिणाम झाला आहे अशी जोरदार टिका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. सीरम इंस्टिट्यूटचे अदर पुनावाला यांच्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘मोदी मित्र’ म्हणत टिका केली होती, याला प्रतिउत्तर देताना भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचा घटक असलेल्या काँग्रेसचे नेते व खासदार राहुल गांधी यांनी सिरम इंडियाने आज घोषित केलेल्या लसीच्या किंमतीला हरकरत घेतली आहे. राहुल गांधी यांना सीरमच्या या घोषणेमध्ये मोदीजींच्या मित्राचा फायदा दिसत आहे. बहुतेक नुकतीच कोरोनाची लागण झाल्याने देशाचे एकमेव ‘विनोदरत्न’ राहुल गांधी यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, असा मार्मिक टोलाही पाटील यांनी लगावला.

गेल्या अनेक महिन्यांपासून पुण्याची सीरम इंडिया आपल्या देशातील लोकांना कोरोनापासून वाचवण्यासाठी आर्थिक आणि वैद्यकीय जोखीम उचलून लस उत्पादन करत आहे. सीरम इंडियाने आज आपल्या लसीची किंमत पारदर्शकपणे लोकांसमोर ठेवली आहे. आजही ही लस जगातील अन्य सर्व लसींपेक्षा स्वस्त असल्याचे स्पष्ट करतानाच पाटील म्हणाले की, राहुल गांधींची ही भूमिका देशविरोधी आहे. राहुल गांधी हे केवळ काँग्रेसचे नेते नसून देशासाठी खूप मोठा धोका आहे, त्यामुळेच प्रत्येक निवडणुकीत जनतेने काँग्रेसला उत्तमरीत्या आपटले आहे.

- Advertisement -

महाराष्ट्राचेच दुर्भाग्य की त्याला आजच्या कठीण काळात अशा संकुचित विचारांचे सरकार मिळाले आहे. उद्धवजी आणि पवारसाहेब, तुमच्याकडे राहुल गांधी आणि त्यांच्या काँग्रेस पक्षाला त्याची जागा दाखवण्याची आणि सीरमकडून महाराष्ट्राला शक्य तितक्या अधिक लसी घेण्याची नामी संधी चालून आली आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या हितासाठी या संधीचा लाभ घ्या व तुमच्या मित्रपक्षांच्या नेत्यांना वायफळ बडबड करण्यापासून रोखावे, असा खोचक सल्लादेखील यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -