संजय राऊत महाभारतातले त्यामुळे धृतराष्ट्राला दिसत नाही ते त्यांना दिसतं, चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला

chandrakant patil slams sanjay raut on women safety
संजय राऊत महाभारतातले त्यामुळे धृतराष्ट्राला दिसत नाही ते त्यांना दिसतं, चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला

महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात येत आहे. परंतु राज्यात महिला आयोग अध्यक्षपद रिक्त असताना चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला गांभीर्याने घेऊ नये असे वक्तव्य केलं होते. महाविकास आघाडीच्या महिला काम करत असल्याचे राऊत यांनी म्हटलं आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. महाविकास आघाडीच्या महिला अदृष्या काम करत आहेत. सामन्यांना दिसत नाही परंतु संजय राऊत हे महाभारतातील संजय आहेत त्यामुळे धृतराष्ट्राला जे दिसत नाही ते त्यांना दिसते असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना लगावला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना खासदार संजय राऊतांवर घणाघाती हल्ला केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की, महिला नेत्या काम करत आहे ते त्यांना दिसतं कारण अदृष्य काम आहे ना.. त्यामुळे त्यांना अदृष्य डोळे आहेत. पण आम्ही जी सामन्य माणसे आहोत ज्यांना सामन्य डोळे आहेत. सामन्या माणसांना दिसत नाही म्हणून म्हटलं संजय राऊत महाभारतातले संजय आहेत त्यामुळे त्यांना सगळं दिसतं. धृतराष्ट्राला जे दिसत नाही ते राऊतांना दिसतं त्यामुळे फार मोठं व्यक्तिमत्त्व आहे. असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

उशीरा का होईना महिला आयोग अध्यक्षपदी नेमणूक

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर केलेल्या टीकेवर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी नेत्या रुपाली चाकणकर या चित्रा वाघ यांच्या जुन्या सहकारी आहेत. त्यामुळे जुन्या अनुभवाच्या आधारे टीका केली असेल. उशीरा का होईना पण कोणाला तरी महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नेमण्यात येत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

यंत्रणा पवारांच्या आरोपावर प्रतुत्तर देईल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय यंत्रणा राजकीय हेतूने काम करत असल्याचा आरोप केला होता. यंत्रणा स्वतः पवारांच्या आरोपांना प्रत्युत्तर देईल असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. शरद पवार आणि त्यांच्यासंबंधीत असलेल्यांवर पहिल्यांदाच छापेमारी करण्यात येत आहे. आयकर विभागाची धाड, सीबीआय चौकशी, ईडी चौकशी हे कॉमन आहे. बाकिच्यांवर धाड पडल्यावर चालते परंतु तुमच्यावर छापेमारी केल्यावर सूड उगवण्याचा भाग, अधिक वेळ थांबलेत पाहुणचार घेत आहेत असं म्हणणं बरोबर नाही असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.


हेही वाचा : न्यायप्रविष्ठ प्रकरणावर बोलणं योग्य नाही, समीर वानखेडेंची मलिकांच्या आरोपावर प्रतिक्रिया