मी पाटील आहे; संजय राऊतांपेक्षा भयानक बोलू शकतो, पण… चंद्रकांत पाटलांचा सूचक इशारा

भाजपाविरोधी पक्षांनी आशा ठेवायला आणि प्रयत्न करायला हरकत नाही. शिवसेनेला गोव्याच्या गेल्या विधानसभा निवडणुकीत एकूण ७९२ मते मिळाली होती तरीही यावेळी त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केलाच असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Sanjay Rauts reply to Chandrakant Patil conduct ED inquiry in Goa constituencies
कोल्हापूर कशाला गोव्यातील मतदारसंघांमध्ये ईडी चौकशी लावा, संजय राऊतांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यामध्ये जोरदार वाकयुद्ध सुरु आहे. दोन्ही नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊतांकडून भाजप नेत्यांविरोधात अपशब्दांचा वापर झाला आहे. यावरुन मी गावचा पाटील आहे. संजय राऊतांपेक्षा भयानक बोलू शकतो असा इशाराच चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. खालच्या पातळीची भाषा वापरणे ही माझी संस्कृती नाही असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी राऊतांच्या अपशब्दांवर प्रत्युत्तर दिलं आहे. “मी कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावचा पाटील आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यापेक्षा भयानक बोलू शकतो. पण त्यांना कळेल म्हणून तशी भाषा वापरणे ही माझी संस्कृती नाही,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले. संजय राऊत यांनी त्यांच्या शिवराळ भाषेचे समर्थन करताना समोरच्याला कोणती भाषा कळते, त्या भाषेत आपण बोलतो, असे त्यांना सांगितले यावर चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे.

तेलंगणचे मुख्यमंत्री मुंबईत आले व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटून भाजपाविरोधी प्रादेशिक पक्षांची आघाडी तयार करण्याची चर्चा केली. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी असेच बिगरभाजपा पक्षांचे महागठबंधन तयार केले होते व आता भाजपाला बहुमत मिळणार नाही अशी हवा निर्माण केली होती. तरीही त्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाच्या जागा वाढून पक्षाला ३०३ जागांसह पूर्ण बहुमत मिळाले. २०२४ लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या जागा आणखी वाढतील. पण भाजपाविरोधी पक्षांनी आशा ठेवायला आणि प्रयत्न करायला हरकत नाही. शिवसेनेला गोव्याच्या गेल्या विधानसभा निवडणुकीत एकूण ७९२ मते मिळाली होती तरीही यावेळी त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केलाच असे चंद्रकांत पाटील म्हणाले.


हेही वाचा : नाशिक महापालिकेवर पुन्हा भाजपचा भगवा फडकणार, देवेंद्र फडणवीसांचा दावा