घरताज्या घडामोडीदेवेंद्र फडणवीस, दरेकरांनी जमिनीवरुन दौरा केला, चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

देवेंद्र फडणवीस, दरेकरांनी जमिनीवरुन दौरा केला, चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

Subscribe

पंतप्रधानांच्या दौऱ्यावरील टीकेला प्रत्युत्तर

तौत्के चक्रीवादळाच्या तडाख्याने कोकणात मोठे नुकसान झाले आहे. आज (शुक्रवार) विरोधी पक्षनते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. कोकणातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री कोकणात दाखल झाले आहेत. फडणवीस गुरुवारपासून कोकणातील पाहणी करत आहेत. परंतु या दौऱ्यामध्ये राजकीय टीप्पण्या सुरु आहेत. मुख्यमंत्र्यांनी कोकणासोबत दुजाभाव केल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली आहे. तर हेलिकॉप्टरमधून तर आलो नाही जमिनीवर आहे असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेत्यांना लगावला होता यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस, दरेकरांनी जमिनीवरुन दौरा केला परंतु तुमचे पाय जमिनीवर आहेत याच्या तुम्हाला खुप खुप शुभेच्छा असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेरकर या दोन्ही सभागृहाच्या नेत्यांनी कोकणातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तौत्के चक्रीवादळाचा तडाखा बसल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. रायगड,रत्नागिरी, सिंधुदूर्गचा या दोन्ही नेत्यांनी पाहणी केली आहे. आता दौरा पुर्ण करुन फडणवीस गोव्यावरुन निघतील असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काही हवाई प्रवास केला नाही.

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस, दरेकरांनी जमिनीवरुन दौरा केला

वादळामध्ये नुकसान झालेल्यांना नाराज करणार नाही सरकार त्यांच्यासोबत आहेत. हेलिकॉप्टरमधून तर आलो नाही जमिनीवर आहे असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेत्यांना लगावला होता यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे कधी नव्हे तर ते बाहेर पडले आहेत. सुमारे दीड वर्षाच्या कालावधीनंतर ते बाहेर पडलेत. त्यांना आता इतरांना उपदेश करण्याचा कारण नाही माझा हवाई प्रवास नाही माझा जमिनीवर प्रवास आहे. परंतु तुमचे पाय जमिनीवर आहेत याच्या तुम्हाला खुप खुप शुभेच्छा असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. कारण सरकार आल्यापासून तुमचे पाय वर हवेत गेलेत ते जमिनीवर आहेत याचा आनंदच आहे आम्हाला असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

भाजप आमदार आशिष शेलार आणि मनिषा चौधरी यांनी पालघर मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर असलेल्या कोळीबांधवांच्या भेटी घेतल्या आहेत. त्यांच्या व्यथा आणि किती बोटींचे नुकसान झाले आहे. याबाबत आढावा घेतला आहे. ठाणे, पालघर जिल्ह्यातील सर्वठिकाणचा आढावा घेण्यात आला आहे. मुंबईतील कोळीवाड्यातील बांधवांच्या भेटी घेण्यात येणार आहे.

- Advertisement -

पंतप्रधानांच्या दौऱ्यावरील टीकेला प्रत्युत्तर

पंतप्रधान ही अशी व्यक्ती आहे त्याला धोका पत्करणे अवघड असते. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा त्यांना सुचवते की आधिकाधिक पाहणी करायची असल्यास हवाई पाहणी करा आणि हीच परंपरा आहे. इंदिरा गांधीही अशीच पाहणी करत होत्या. त्यामुळे टीका टीप्पणी करताना इतिहास पाहा. पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दुजाभाव करत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रातला प्रवास ठरला परंतु देवेंद्र फडणवीसांनी प्रवास थांबवला त्यांना प्रामुख्याने हावाई प्रवास करताना महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यावर हवामान योग्य नसल्याचे समजले आहे. त्यामुळे त्यांनी गुजरातचा हवाई दौरा केला परंतु तिथे मदत जाहीर करताना देशातील सर्व मृतांना २ लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. यानंतर महाराष्ट्र आणि गोवा प्रशासनाला प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे. अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -