संजय राऊतांचं वाक्य भयंकर, मुख्यमंत्र्यांनी कारवाई करण्याची चंद्रकांत पाटलांची मागणी

संजय राऊत हे शरद पवार यांच्यासाठी काम करत असल्याचे उद्धव ठाकरे यांना कळत नाही आहे.

chandrakant patil

आम्ही पाठीत खंजीर खुपसलत नाही, तर कोथळा बाहेर काढतो, असे संजय राऊत यांनी म्हटलं असून त्यांचे वक्तव्य भयंकर आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आवाहन करतो की संजय राऊतांवर कारवाई करावी, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी थोबाडीत मारली असती असे वाक्तव्य केलं तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते तर राऊतांचे वक्तव्य फार भयंकर आहे. यामुळे त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. आता कोणत्याही मोठ्या पक्षासोबत युती करणार नाही कारण आमच्या मताच्या आधारे जागा वाढवून आमच्याशी विश्वासघात केलेला चालणार नाही असा टोला शिवसेनेला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिवसेनेला कानपिचक्या दिल्या आहेत. “मी पाठीत खंजीर खुपसला असं सांगितले आणि ते त्यांना झोबलं. त्यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली की, आम्ही पाठीत खंजीर खुपसत नीाही तर कोथळा काढतो. यामुळे उद्धव ठाकरे यांना आवाहन कारवाई करण्याचे आवाहन केलंय, तसेच कार्यकर्त्यांनाही आवाहन करतो की, त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार द्यावी. जर राणेंना थोबाडीत मारली असती या वाक्यावर अटक होऊ शकते तर राऊतांचे वक्तव्य भयंकर आहे. यामुळे उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील शाळेत आता पवारांनी कोणाकोणाच्या पाठीत खंजीर खुपसला हा धडा शिवकवण्याचे राहिलं आहे. वसंतदादा यांच्या पाठीत खंजीर कोणी खुपसला, वा राऊत वा तुम्ही इतिहास बदलायला निघाला आहेत असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. संजय राऊत हे शरद पवार यांच्यासाठी काम करत असल्याचे उद्धव ठाकरे यांना कळत नाही आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते देखील राष्ट्रवादीत जात आहेत. राष्ट्रवादी एक एक पंचायत समिती खात आहे तरी उद्धव ठाकरे यांना कळत नसल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.


हेही वाचा : मुख्यमंत्र्यांनी जाब विचारुन उत्तर द्यावे, महिला सरपंच मारहाण प्रकरणावरुन चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया