घरताज्या घडामोडी२०१९ला हिंदुत्व मागे पडलं आणि विश्वासघात झाला - चंद्रकांत पाटील

२०१९ला हिंदुत्व मागे पडलं आणि विश्वासघात झाला – चंद्रकांत पाटील

Subscribe

महाराष्ट्रासह विदेशातही दोन विचारधारा काम करत असतात. हिंदुत्ववादी विचारधारेला मान्य असणाऱ्या अनेकांनी त्या-त्या वेळेला युती केली. २०१९ ला सुद्धा युती झाली. परंतु कृतीनंतर हिंदुत्व मागे पडलं आणि खुर्ची पुढे आली, त्यामुळे विश्वासघात झाला. हिंदुत्व त्याने कधीही मानलं नाही. कारण हिंदुत्व हा त्यांचा अजेंडा नाही. हिंदुत्व न मानल्यामुळे बाळासाहेबांनी सातत्याने आसूड ओढले, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

सुरूवातीला महाविकास आघाडीचं नाव महाशिवआघाडी होतं. परंतु ते कधीच महाविकासआघाडी झालं हे कळलंच नाही. यासाठी एक लॉजिक मानली गेली. कारण विकास महत्वाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील विकास केला. पण हिंदुत्व वाढलं. मुघलांशी संघर्ष केला. तसेच देश-धर्मासाठी त्यांनी आपलं आयुष्य घालवलं. सर्वसामान्य हिंदूंना आधार निर्माण व्हावा म्हणून राज्याभिषेक करून हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, असं पाटील म्हणाले.

- Advertisement -

समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये सांस्कृतिक हिंदुत्वाच्या आधारे मुर्ती पूजा नाही. मुर्तीपूजा हा त्यांच्यातल्या उपचाराचा
एक भाग आहे. समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये हिंदुत्वाच्या आधारे त्या क्षेत्राची रचना लावण्यासाठी राजकीय क्षेत्रामध्ये भारतीय जन संघ नावाने भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. त्यामुळे कधीही हिंदुत्वासाठी प्रयत्न आणि संघर्ष तसेच हिंदुत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न श्यामाप्रसाद मुखर्जींनी बलिदान दिलं ते ३७० कलम रद्द करा. काश्मीर भारतात रहायला पाहीजे. येथून तिची सुरूवात होईल ते अलीकडच्या काळातील रामजन्मभूमी मुक्तीच्या आंदोलनातील असेल किंवा पालघरला साधूंचं हत्याकांड झाल्यानंतर सरकारने कारवाई करावी, यासाठी संघर्ष असेल किंवा या सगळ्या घटनांमध्ये हिंदुत्व आमचा श्वास आहे. हिंदुत्व आमचा ध्यास आहे, हे आम्ही सातत्याने सगळ्या कृतीतून दाखवत आलो. असं पाटील म्हणाले.


हेही वाचा : रत्नागिरीकरांचे वैदयकीय महाविद्यालयाचे स्वप्न पूर्ण होणार – उदय सामंत

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -