शिवसेनेनं संभाजीराजेंची अपेक्षा पूर्ण करून त्यांचा सन्मान करावा – चंद्रकांत पाटील

bjp chandrakant patil speck on shiv sena eknath shinde revolt and maharashtra political crisis

राज्यसभेसाठी माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती (MP Sambhaji Raje Chhatrapati) यांच्या नावाला शिवसेनेकडून पूर्णविराम मिळाल्याचं सांगितलं जात आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना (Shivsena) संभाजीराजे छत्रपती यांची उमेदवारी उद्या जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, राज्यसभेच्या जागेबाबत भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी (BJP President) मोठं विधान केलं आहे. शिवसेनेनं संभाजीराजेंची अपेक्षा पूर्ण करून त्यांचा सन्मान करावा, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापुरात (Kolhapur) पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, ज्यावेळी संभाजीराजेंना राज्यसभा देण्याचा निर्णय झाला, तेव्हा महाराष्ट्रातील तीन जागांमधून एक जागा देण्याचं नियोजन होतं. परंतु, हे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना समजलं तेव्हा त्यांनी राजांना तुम्ही भाजपच्या कार्यालयात एबी फॉर्मवर (AB Form) सह्या करण्यासाठी बोलावणार आहात का, असा प्रश्न आम्हाला विचारला. आपण त्यांना सन्मानपूर्वक राष्ट्रपती कोट्यातून खासदार करू, असा शब्द त्यांनी दिला. त्यानुसार त्यांनी सहा वर्षे काम केलं. आता शिवसेनेनंही संभाजीराजेंचा सन्मान करावा, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ज्येष्ठ शिवसैनिकाचं नाव जाहीर केलं जाऊ शकतं. त्यानंतर येत्या २६ मे रोजी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि उद्या जाहीर होणारे उमेदवार राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

शिवसेना, राष्ट्रवादीसह भाजपानेही यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. सध्या यासाठी संभाजीराजे छत्रपती यांच्या नावावरुन ही निवडणुक रंगणार असल्याची चर्चा आहे. संभाजीराजे अपक्ष लढण्यावर ठाम असून शिवसेना, राष्ट्रवादीकडून त्यांना पक्षात येण्यासाठी ऑफर येत आहेत. त्यामुळे अगामी काळात या निवडणुकीसाठी संभाजीराजे कोणती भूमिका घेणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा : राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार, संभाजीराजे छत्रपतींची घोषणा