घरताज्या घडामोडीउद्धवजी मोंदीना चोर म्हणाले, किती केसेस दाखल करायच्या - चंद्रकांत पाटील

उद्धवजी मोंदीना चोर म्हणाले, किती केसेस दाखल करायच्या – चंद्रकांत पाटील

Subscribe

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कोकणातील जन आशीर्वाद यात्रेच्या प्रतिसादाला रोख लावण्याचा हा प्रयत्न आहे. पण बॉल आपटला की उसळी मारूनच वर येणार अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. सध्या राज्य सरकारचा सत्तेचा दुरूपयोग आहे. त्यामुळेच सत्तेचा वापर करून प्रशासकीय समज देऊ शकता, पण केंद्रीय मंत्र्याला अटक करता येत नाही. अटक ही सूडबुद्धीनेच होत असल्याचेही ते म्हणाले. एखाद्या पक्षातून प्रतिक्रिया आली की त्यावर दुसरीकडून प्रतिक्रिया येणे हे स्वाभिकच असते असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसतानाही पंढरपूरमध्ये ते पंतप्रधानपदी असणाऱ्या नरेंद्र मोदींना चोर म्हणाले. मुख्यमंत्री असतानाही दसऱ्या मेळाव्यात पंतप्रधानांवर वक्तव्ये केली, यावर किती केसेस दाखल करायच्या असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. प्रत्येकवेळी कोर्टाकडून फटके खातात पण सुधरत नाहीत, असाही टोला त्यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला. (Chandrakant patil supports narayan rane’s slap statement on cm uddhav thackeray)

राणेंची आपली कार्यपद्धती आणि स्टाईल आहे. त्यांच्या आक्षेपार्ह शब्दातून अटकेची सूडबुद्धीची भाषा करू नये असेही ते म्हणाले. नारायण राणे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचे समर्थन नाही करत, पण राजकीय पक्षात अशा पद्धतीची वक्तवे ही होतच असतात. त्यासाठी सत्तेचा दुरूपयोग करायचा नसतो अशीही प्रतिक्रिया त्यांनी दिली. नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत. त्यामुळे त्यांना कोणतेही राज्य सरकार अटक करू शकत नाही. राणेंच्या वक्तव्यासाठी एखादे राज्य सरकारल केवळ समज देऊ शकते. पण अटकेची भाषा ही केवळ सत्तेच्या जोरावर असल्याचे ते म्हणाले. नाशिकच्या भाजप कार्यालयावर झालेल्या दगडफेकीवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाशिक कार्यालयावर होणारी दगडफेक हे भ्याडपणाचे लक्षण आहे. त्यामुळेच अशा प्रकारच्या भ्याड हल्ल्यांना आम्ही घाबरत नाही असेही ते म्हणाले.

- Advertisement -

केसेस दाखल करायच्या असतील तर राज्यात खूप प्रकरणे आहेत, असे सांगत त्यांनी महाविकास आघाडी सरकारला वादग्रस्त माजी वनमंत्री संजय राठोड यांच्या प्रकरणाची आठवण करून दिली. तसेच औरंगाबादच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर असलेल्या बलात्काराच्या आरोपाचीही आठवण करून दिली. त्यासोबतच विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या पक्षाच्या प्रवक्त्या म्हणून कशा बोलतात, असाही सवाल त्यांनी केला. नीलमताईंनी आपल्या पदाचा मान राखत पक्षाची भूमिका मांडणे टाळायला हवे असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.


हे ही वाचा Narayan Rane VS Shiv Sena: नाशिकमधील भाजप कार्यालयावर शिवसैनिकांकडून दगडफेक

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -