Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र मी मुख्यमंत्र्यांसारखा डॉक्टर अन् राऊतांसारखा कंपाऊंडर नाही, चंद्रकांत पाटलांचा टोला

मी मुख्यमंत्र्यांसारखा डॉक्टर अन् राऊतांसारखा कंपाऊंडर नाही, चंद्रकांत पाटलांचा टोला

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या चर्चेवरुन चंद्रकांत पाटील यांचा टोला

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या चर्चेवरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना टोला लगावला आहे. तिसरी लाट येईलच हे सांगण्यासाठी आपण उद्धव ठाकरेंसारखे डॉक्टर किंवा संजय राऊत यांच्यासारखे कंपाऊंडर नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटील हे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

तिसरी लाट येणारच नाही असं भाकीत करण्यासाठी मी उद्धव ठाकरे यांच्यासारखा डॉक्टर नाही आणि संजय राऊत यांच्यासारखा कंपाऊंडर नाही. त्यामुळे ती येऊ पण शकते, माहित नाही. कारण कोविड फक्त उद्धव ठाकरेंशी बोलतो. तो सांगतो आता लाट कमी झाली आहे आणि आता लाट वाढणार आहे. माझ्याशी ते बोलत नाहीत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. दुसरी लाट बऱ्यापैकी ओसरल्यानंतर जनजीवन सुरु करायला पर्याय नाही. काळजी घेऊन जनजीवन सुरळीत करावं लागेल, असं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले.

अशा विश्वास घातक्यांबरोबर आम्हाला काम करायचं नाही

- Advertisement -

भाजप आता स्वतःच्या पायावर मजबूत होत चालली आहे. प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे. मोठ्याप्रमाणावर संघटन निर्माण होत आहे. ज्यांनी मोदींच्या नावाने मतं मागितली. भाजपचे ५ वर्षे उत्तम राज्य चाललं, त्याच्याच आधारे त्यांनी मत मिळवली आणि ५६ वर मुख्यमंत्री झाले, ५४ वर उपमुख्यमंत्री झाले आणि ४४ वर महसूल मंत्री झाले. अशा विश्वास घातक्यांबरोबर आम्हाला काम करायचं नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

 

- Advertisement -