Homeमहाराष्ट्रChandrakant Patil : माजी नगरसेवकांचा भाजपाप्रवेश, ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळत चंद्रकांतदादा म्हणाले...

Chandrakant Patil : माजी नगरसेवकांचा भाजपाप्रवेश, ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळत चंद्रकांतदादा म्हणाले…

Subscribe

मुंबईतील भाजपच्या मुख्यालयात पुण्यातील शिवसेनेच्या माजी ५ नगरसेवकांचा प्रवेश झाला.

पुण्यातील शिवसेनेला ( ठाकरे गट ) गळती लागली आहे. शिवसेनेच्या ( ठाकरे गट ) पाच माजी नगरसेवकांनी भाजपत प्रवेश केला आहे. यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला एकच धक्का बसला आहे. याला पुण्याकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं संपर्क कमी असल्याचं कारण सांगण्यात येत आहे. माजी नगरसेवकांच्या प्रवेशानंतर मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे.

मुंबईतील भाजपच्या मुख्यालयात शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल धनवडे, बाळा ओसवाल, संगीता ठोसर, पल्लवी जावळे, प्राची आल्हाट यांनी प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार रवींद्र चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर बोलताना पुण्यात फार काही शिवसेनेत शिल्लक उरलंय, असं म्हणत चंद्रकांतदादांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

हेही वाचा : बापरे! भाजी विक्रेत्यानं टोरेसमध्ये गुंतवलेले ४ कोटी रूपये, कुठून आले एवढे पैसे?

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, “पुण्यामधील सर्वांनी दखल घ्यावी, अशा भूकंपाच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित आहोत. मी अतिशय विचारपूर्वक भूकंप हा शब्द वापरला. बहुदा माजी नगरसेवकांच्या येण्यानंतर शिवसेनेत ( ठाकरे गट ) फार काही शिल्लक उरलंय, असं वाटत नाही. स्वत:च्या ताकदीवर 2017 मध्ये भाजपनं एकहाती सत्ता आणली. माजी नगरसेवकांच्या येण्यानं पक्ष अजून मजबूत झाला आहे.”

“नव्यानं आलेल्या आणि भाजपच्या जुन्या लोकांना माझी विनंती आहे. घरात एखादी नवीन सून येते, तेव्हा सूनेची जबाबदारी असते, नव्या घराच्या परंपरा समजून घेणे… आणि जुन्यांची जबाबदारी असते, सून नवीन आली आहे, हळूहळू कळेल तिला…,” असा सल्ला चंद्रकांतदादांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि नव्यानं प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांना दिला आहे.

“भाजपच्या जुन्या नेत्यांना सांगतो, सगळ्यांना सामावून घ्यायचं आहे. खूप मेहनतीनं हा पक्ष अनेकांच्या घामातून हा पक्ष उभा राहिला आहे. त्यामुळे नव्यानं आलेल्यांना सुद्धा भाजपच्या परंपरा समजून घेतल्या पाहिजेत. आगामी काळात राजकीय काम करणाऱ्यांना मोठे भविष्य आहे. 2029 मध्ये विधानसभा निवडणुकीत मतदारसंघाच्या पुर्नरचना होणार आहे. लोकसंख्या वाढल्यानं महापालिकेतही नगरसेवक वाढणार आणि प्रभाग बदलणार आहे,” असं चंद्रकांतदादांनी सांगितलं.

हेही वाचा : विधानसभेचा धडा, ‘मनपा’ निवडणुकीआधी राज ठाकरे मोठा निर्णय घेणार? मनसेच्या बैठकीत काय ठरलं?