घरमहाराष्ट्रपाटील कसा फटका लगावतो समजत नाही

पाटील कसा फटका लगावतो समजत नाही

Subscribe

चंद्रकांत पाटील यांचा शरद पवारांना टोला

पवारांना पाटील कळलेच नाहीत. पाटील चेहर्‍यावर कोणतेही भाव आणत नाहीत, मात्र कसा फटका लगावतो हे समजत नाही, असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावला.
कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ आयोजित शिवसेना पदाधिकार्‍यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. शिवाजी पेठेतील गडकरी हॉल येथे हा मेळावा झाला.

ज्या मनसेला आघाडीत घेतले नाही, त्या मनसेच्या उमेदवाराला कोथरुडमध्ये माझ्याविरोधात पाठिंबा देण्याची वेळ त्यांच्यावर आली, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. कोथरुड मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात मनसेचे किशोर शिंदे मैदानात आहेत. या मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीने उमेदवार न देता मनसेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील विरुद्ध सर्वपक्षीय अशी लढत होत आहे.

- Advertisement -

चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमध्येच अडकवून ठेवले,असे शरद पवार म्हणत आहेत. मात्र पवार तुम्हाला पाटील कळलेच नाहीत, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. यावेळी पाटील यांनी युतीधर्म पाळावाच लागेल, असे निक्षून सांगितले. यावेळी भाजप- शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर बायकोच्या विरोधातही प्रचारविरोधी पक्षातून माझी बायको जरी उभारली तरी तिचा प्रचार माझ्याकडून होणार नाही. सकाळी एकत्र चहा घेऊन बाहेर पडू. पण नंतर मात्र दिवसभरात काय झाले याची विचारणाही तिच्याकडे करणार नाही अशा शब्दात पाटील यांनी कार्यकर्त्यांना डोस दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -