Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी राज्यात २६ तारखेला जेलभरो आंदोलनात १ लाख कार्यकर्ते अटक करुन घेणार, चंद्रकांत...

राज्यात २६ तारखेला जेलभरो आंदोलनात १ लाख कार्यकर्ते अटक करुन घेणार, चंद्रकांत पाटील यांचा हल्लाबोल

भाजपचे शिष्टमंडळ गुरुवार सकाळी ११ वाजता राज्य निवडणुक आयुक्तांची भेट घेणार

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रात २६ तारखेला जेलभरो आंदोलनाची सुरुवात सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे. राज्यात १००० ठिकाणी आंदोलन करण्यात येणार असून प्रत्येक ठिकाणी १०० कार्यकर्ते अटक करून घेणार आहेत. सर्व नेते रस्त्यावर उतरणार आहेत. तरीही सरकार ऐकणार नसेल तर खुप मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येणार आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले असताना ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण असलेल्या ठिकाणी निवडणुक लावणे म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

भाजपचे शिष्टमंडळ गुरुवार सकाळी ११ वाजता राज्य निवडणुक आयुक्तांची भेट घेणार आहे. या भेटीमध्ये महाराष्ट्रातील परिस्थिती सांगणार असून निवडणुक न घेण्याची विनंती करण्यात येणार आहे. कोरोना असताना कोल्हापुरात निवडणुक घेण्यात आल्या परंतु त्याचे परिणाम वाईट झाले आहेत. गोकुळ निवडणुकीत जे ३६०० मतदान करणारे सदस्य होते त्यातील १०० जणांना कोरोनाची लागण झाली होती तरी त्यांना पीपीई कीट घालून मतदानासाठी आणण्यात आले ही हद्दच झाली असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

राज्यात सर्वत्र कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट कमी होत आहे. परंतु कोल्हापुरात अजूनही १७०० ते १८०० कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. महाराष्ट्रात एकमात्र कोरोना रुग्णांची संख्या वाढणारा कोल्हापुर जिल्हा आहे. यामुळे निवडणुकीचा हट्ट सोडला पाहिजे. ओबीसी आक्षणाबाबत न्यायालयात दाद मागण्यासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे या संभाजीनगरच्या न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

तर सर्व जागांवर ओबीसी उमेद्वार देऊ

ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागल्याशिवाय निवडणुक होऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा भाजपने घेतला आहे. बुधवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन राज्यातील प्रश्न मांडले. तसेच निवडणुक पुढे ढकलण्याची विनंती करण्यासाठीही भेट घेतली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी म्हटलं आहे की, राज्य सरकारचा जर जिल्हा परिषद निवडणुक घेण्याचा डाव असेल तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत सर्व जागांवर ओबीसी उमेदवार देऊ, जिंकलो आणि हारलो तर आम्ही बघून घेऊ असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

ओबीसी समाजाला अंधकारात ढकलतील

- Advertisement -

आताच्या निवडणूका लागल्या त्या रद्द करण्यात आल्या पाहिजेत अशी मागणी आहे. सरकारने निवडणूक आयोगाशी संपर्क साधून निवडणूक रद्द करण्याची मागणी केली पाहिजे. भाजपकडून निवडणुक आयोगाला पत्र पाठवण्यात येणार आहे. तसेच न्यायालयात धाव घेणार असल्याचेही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. या निवडणुका ओबीसीच्या भविष्याला अंधकारात ढकलण्याच्या ठरतील यामुळे ओबीसी राजकीय आरक्षणाचे संरक्षण झाल्याशिवाय इम्पेरिकल डेटाच्या आधारावर सरकारने डेटा दिल्याशावर आणि ओबीसीला आरक्षण दिल्याशिवाय निवडणुक होऊ नये या मागणीवर भाजप ठाम असल्याचे मत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं आहे.

- Advertisement -