Wednesday, May 5, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र 'जामिनावर आहात, जोरात बोलू नका अन्यथा...'; चंद्रकांत पाटलांचा भुजबळांना इशारा

‘जामिनावर आहात, जोरात बोलू नका अन्यथा…’; चंद्रकांत पाटलांचा भुजबळांना इशारा

Related Story

- Advertisement -

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींसह पंढरपूर पोटनिवडणुकीचा निकाल हाती येत आहे. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. यावर प्रतिक्रिया देताना अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर टीका केली होती. त्यावर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी छगन भुजबळ यांना इशारा दिला आहे. छगन भुजबळांनी पंढरपूरवर प्रतिक्रिया द्यावी, जामिनावर सुटलेला आहात, तुम्ही निर्दोष सुटलेले नाहीत. त्यामुळं तुम्ही फार जोरात बोलू नका अन्यथा फार महागात पडेल, असा धमकीवजा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला.

छगन भुजबळांनी बंगालच्या निकालावरुन भाजपवर टीका केली होती. यावर चंद्रकांत पाटलांनी भुजबळांना इशारा दिला. छगन भुजबळांनी पंढरपूरवर प्रतिक्रिया द्यावी, जामिनावर सुटलेला आहात, तुम्ही निर्दोष सुटलेले नाहीत. त्यामुळं तुम्ही फार जोरात बोलू नका अन्यथा फार महागात पडेल. बोलायचं असेल पंढरपूर, आसाम, पुद्दुचेरीवर बोला, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

- Advertisement -

पश्चिम बंगालमध्ये ममता जिंकल्या तर ईव्हीएम बरोबर आहे आणि आसाममध्ये भाजप जिंकली तर ईव्हीएम चूक आहे, असं होत नाही. बंगालमधील पराभवाचं दु:ख तर वाटणारच. आम्ही कुठलीही गोष्ट कार्यकर्ते म्हणून करतो. आम्ही निवडणुका फार गांभिर्याने घेतो. पराभव जरी झाला असला तरी भाजप विरोधात सगळे एकत्र आले होते हे लक्षात घ्यायला हवं, असं पाटील म्हणाले.

 

- Advertisement -