घरताज्या घडामोडीमराठा समाजाला आरक्षण द्यायचे की नाही ते स्पष्ट करा, चंद्रकांत पाटलांचे अशोक...

मराठा समाजाला आरक्षण द्यायचे की नाही ते स्पष्ट करा, चंद्रकांत पाटलांचे अशोक चव्हाणांना आव्हान

Subscribe

मागास आयोगाच्या अहवालानंतर ५० टक्क्यांची मर्यादेचा विषय येतो.

केंद्र सरकारने आरक्षण देण्याचे अधिकार राज्याला दिले आहेत. राज्य सरकारने आता मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण द्यायचे की नाही ते स्पष्ट करा असं आव्हान चंद्रकांत पाटील यांनी अशोक चव्हाण यांना दिलं आहे. राज्य सरकारमुळे आरक्षण गेले आणि अशोक चव्हाण यांनी समाजाची दिशाभूल केली आहे. राज्याला अधिकार दिल्यानंतर आता राज्य सरकार ५० टक्क्यांच्या मर्यादेवर अडून बसले आहे. यामुळे मराठा समाजाला आरक्षण द्यायचे आहे की नाही ते त्यांनी स्पष्ट करावे असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकारला मराठा समाजास आरक्षण द्यायचे आहे की नाही ते स्पष्ट सांगावं असे आव्हान दिलं आहे. तर सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू राज्य सरकारने व्यवस्थित मांडली नसल्यामुळे आरक्षण गेले. मात्र मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि मंत्री अशोक चव्हाण मराठा आरक्षणाबाबत नवे मुद्दे उपस्थित करुन दिशाभूल केली असा आरोपही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. राज्य सरकारला घटनादुरुस्ती करुन पुर्ण अधिकार दिले आहेत. परंतू राज्य सरकार ५० टक्क्यांची अट शिथिल करण्याच्या मुद्द्यावर अडून बसलं आहे. असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाने गायकवाड अहवाल नाकारला आहे. यामुळे राज्य सरकाला मराठा समाज पुन्हा मागास असल्याचा राज्य मागास आयोगाकडून अहवाल मिळत नाही तोपर्यंत आरक्षण देणं शक्य नाही. मागास आयोगाच्या अहवालानंतर ५० टक्क्यांची मर्यादेचा विषय येतो. राज्य सरकारच्या हातात असलेल्या बाबींवर काही होत नाही आहे. मात्र राज्य सरकार सतत नव्या सबबी पुढे करत आहे. महाविकास आघाडी सरकार मराठा समाजाला मागास ठरवेल आणि नंतर कायदा करण्याच्या अधिकाराचा टप्पा गाठेल त्यावेळी राज्य सरकार इतर मांडण्याचा अधिकार मिळवेल असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. जर दहावीमध्ये नापास होणार असू तर पहिलीपासून शिकूच नये असा पवित्रा अशोक चव्हाण यांचा आहे. असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

केंद्र सरकारने राज्यांना आरक्षण देण्याचे पुर्ण अधिकार दिलं आहेत. एखाद्या समाजाला मागास ठरवण्याचा अधिकार राज्याला नव्हता तो केंद्र सरकारनं दिला आहे. केंद्र सरकारन राज्यांना अधिकार दिलं तर माहाविकास आघाडी सरकार आता नव्या जोमानं काम करत मराठा समाजाला आरक्षण देईल असे वाटलं होते मांत्र राज्य सरकारनं आरक्षण टाळण्याकरता नवा प्रयत्न सुरु केला आहे. यामुळे अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षण द्यायचे की नाही ते स्पष्ट करावे असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -