झोपेत असताना सरकार जाईल, ठाकरे सरकारला १८ महिन्यांचा बोनस; चंद्रकांत पाटील यांचा नवा दावा

१८ महिन्यांपुर्वी सरकारल आल्यापासून कुठल्याही क्षणी जाईल यासाठी बॅग भरुन तयार

Chandrakant Patil accuses Thackeray government of causing more damage to the state
राज्याचे दीड वर्षात अनेक वर्षांपेक्षा जास्त नुकसान, चंद्रकांत पाटील यांचा ठाकरे सरकारवर आरोप

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्यामुळे पुन्हा एकदा सरकार पाडापाडीबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. सरकार टिकवणे हे शिवसेनेचे कर्तव्य आहे का? काँग्रेस, राष्ट्रवादीचे काहीच कर्तव्य नाही का अशी नाराजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यासमोर व्यक्त केल्याची चर्चा आहे. यातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी झोपेत असताना सरकार जाईल असा नवा दावा केला आहे. महाविकास आघाडी सरकारला १८ महिने बोनसमध्ये मिळाले असल्याचे नवे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. तसेच आता लोकं झोपत असताना कधीही सरकार पडेल, असा दावाच चंद्रकांत पाटील यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये झोपेत असतना सरकार पडेल असा दावा केला आहे. पवार आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात काय चर्चा झआली हे कोणाला माहिती नाही. जरी त्यांच्यात राष्ट्रवादी सरकार चालवण्यामध्ये अडथळे निर्माण करत आहे अशी चर्चा झाली असली तरी त्यावर काय टीप्पणी करु शकत नाही.

दरम्यान पाटील यांनी पुढे म्हटले आहे की, दीड वर्षांपुर्वी ज्यावेळी महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. त्यावेळी हा बोनसच होता. ध्यानीमनी नसताना चिमटेच काढत होते. आलो का रे सत्तेत. त्यामुळे १८ महिन्यांपुर्वी सरकारल आल्यापासून कुठल्याही क्षणी जाईल यासाठी बॅग भरुन तयार असतानाही १८ महिने त्यांना सरकार मिळाले आहे. यामध्ये कोविड एक भाग आहे तसेच कदाचित त्यांचे नशिबही असेल. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जसे म्हणतात की, दादा झोपेतून उठल्यावर सरकार गेले होते.. इतक्या अचानक गेले.. केसाने गळा कापणे म्हणतात तसे.. तसेच आताही झोपेत असताना सरकार जाईल असा नवा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना केला आहे.

शिवसेनेचे १० नगरसेवक भाजपमध्ये

जळगावमधील भाजपचे मुक्ताईनगर नगरपालिकेचे १० नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी शिवसेनेच्या माथेरान नगरपरिषदेमधील १० नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. जळगावचा वचपा भाजपने काढला असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेला हा मोठा धक्का बसला असल्याचे म्हटले जात आहे. यामध्ये आकाश चौधरी, उपनगराध्यक्ष,राकेश चौधरी, सोनम दाबेकर, प्रतिभा घावरे, सुषमा जाधव,प्रियांका कदम, ज्योती सोनवळे,संदीप कदम, चंद्रकांत जाधव, रुपाली आखाडे या नगरसेवकांचा समावेश आहे.

सरकार पाच वर्षे पूर्ण करणार – संजय राऊत

दरम्यान प्रसार माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी म्हटले आहे की, ‘तुम्हाला सरकारकडून असे कळवण्यात आले आहे का? अफवांवर विश्वास ठेवू नका? अफवा पसरवणे हा गुन्हा आहे. शरद पवार हे काही दिवस आजारी होते. त्यानंतर बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना भेटले होते. महाराष्ट्रात अनेक विषय आहेत. मराठा आरक्षण, पदोन्नती आरक्षण, कोरोना असे अनेक विषय आहेत. हे सरकार पाच वर्षे पूर्ण करणार. त्यामुळे अशा कोणत्याही चर्चा नाही आहेत आणि शरद पवार यांचा या सरकारला पूर्ण आशीर्वाद आहे’, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली आहे.


हेही वाचा : मराठा समाज अस्वस्थ, दुःखी, शरद पवारांनी पुढाकार घेतला पाहिजे – संभाजीराजे छत्रपती