Thursday, July 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी मोदींच्या धोरणात काँग्रेसचा मेळावा बसेल का?, चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मोदींच्या धोरणात काँग्रेसचा मेळावा बसेल का?, चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मेळाव्याचं आमंत्रण दिलं तर ओबीसी समाजासाठी आम्ही कोणाबरही जायला तयार - चंद्रकांत पाटील

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी देशात एकच धोरण तयार करावे अशी मागणी केली आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना काँग्रेसच्या २९ जुलैच्या मेळाव्यावर सवाल उपस्थित केला आहे. मोदींनी धोरण केल्यावर काँग्रेसचा २९ जुलैचा मेळावा त्यात बसेल का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे. तसेच राज्य सरकारने नर्बंध ठरवताना माणसाचा माणूस म्हणून विचार देखील करावा असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोनापरिस्थितीत गर्दी रोखण्यासाठी थेट पंतप्रधान मोदींकडे मागणी केली आहे. सभा, मेळावे, धार्मिक कार्यक्रम यामुळे गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव पसरत आहे. यामुळे केंद्र सरकारनं धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी एकच धोरण ठरवावं अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी विचार करतील. परंतु पंतप्रधान मोदींनी नियमावली ठरवली तर त्या नियमांच्या चौकटीत काँग्रेसचा होऊ घातलेला २९ जुलैचा मेळावा त्यात बसतो का? यावर विचार करण्याची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

माणसाचा माणूस म्हणुन विचार करा

- Advertisement -

राज्यात अनेक नागरिकांनी दोन कोरोना लसींचे डोस घेतला आहे. यामुळे राज्य सरकारने शिथिलता दिली पाहिजे. दोन डोस घेतल्यानंतरही कोरोनाचा धोका आहे असं राज्य सरकारला दाखवायचं आहे का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला. दोन डोस घेणाऱ्यांना कोरोनाचा धोका फार कमी आहे. किती दिवस अशीच निर्बंध लादणार, दुकानं, मंदिर उघडली पाहिजे. पर्यटन सुरु करायचं की नाही ते ठरवा, जनजीवन सुरु केलं नाही तर लोकं वेडी होतील असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटल आहे. तसेच आमची म्हातारी लेकीला भेटायला गेली नाही. लेक भेटायला आली नाही, वारकरी पंढरीला गेला नाही त्यामुळे काय निर्बंध लावण्यापुर्वी माणसाचा माणूस म्हणुन विचार करा असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.

काँग्रेसचा मेळावा सरकारवर दबावासाठी

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोल यांनी बारामतीमध्ये ओबीसी राजकीय आरक्षणासाठी मेळावा आयोजित केला आहे. हा मेळावा राज्य सरकारच्या विरोधात आहे. राज्य सरकारवर दबाव आणण्यासाठी हा मेळावा असणार आहे. या मेळाव्याचं आमंत्रण दिलं तर ओबीसी समाजासाठी आम्ही कोणाबरही जायला तयार आहोत असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ओबीसी राजकीय आरक्षणासाठी भाजपने जेलभरो आंदोलन केलं यानंतरही राज्य सरकारचा रोख केंद्र सरकारकडे असेल तर यांना कायदा कळतच नाही असे दिसत आहे असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

- Advertisement -