कोरोनाच्या भीतीनं अनिश्चित काळासाठी समाज बंद करुन ठेवणार का?, चंद्रकांत पाटील यांचा सवाल

कोरोना संकट असलं तरी राज्याला असा बंद ठेवून चालणार नाही.

Chandrakant Patil's allegation Conspiracy to create distance in Shiv Sena-BJP alliance
शिवसेना-भाजप युतीत दुरावा निर्माण करण्यामागे षडयंत्र : चंद्रकांत पाटलांचा आरोप

कोरोनाच्या भीतीमुळे राज्य सरकारने निर्बंध लागू करुन लॉकडाऊन सुरुच ठेवला आहे. परंतु कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर समाजाला अनिश्चित काळासाठी बंद करुन ठेवणार का? असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला केला आहे. राज्यातील जनजीवन बंद ठेवून चालणार नाही कोरोनाच्या संकटाला परिस्थितीनुसार सामोरे गेले पाहिजे. ज्या नागरिकांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत अशा नागरिकांना निर्बंधांतून सुट दिली पाहिजे असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही यापुर्वी असे मत व्यक्त केलं आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील कोरोना परिस्थिती आणि निर्बंधांवरुन राज्य सरकारला प्रश्न केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याप्रमाणे यापुर्वी मत व्यक्त केलं आहे. ज्या नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. अशा नागरिकांना निर्बंधांतून सुट द्यावी. सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर वापरण्याचे नियम लावून या नागरिकांना व्यवहारात सुट दिली पाहिजे. कोरोना संकट असलं तरी राज्याला असा बंद ठेवून चालणार नाही. या परिस्थितीला सामोरे गेले पाहिजे असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

कोरोनाच्या भीतीनं अनिश्चित काळासाठी समाजाला बंद करुन ठेवणार आहात का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही दोन लसीचे डोस घेतलेल्या नागिरकांना निर्बंधांमध्ये सुट देण्याबाबत सकारात्मक भूमिका दाखवली आहे. आगामी दिवसात कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना निर्बंधांमध्ये सूट मिळण्याची शक्यता आहे.

चिपळूणमध्ये ढगफुटी

चंद्रकांत पाटील यांनी चिपळूमधील मुसळधार पावसावर चिंता व्यक्त केली आहे. चिपळूमध्ये मुसळधार पावसामुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक घरांच्या पत्र्यापर्यंत पाणी आले आहे. पूरस्थितीती निर्माण झालेल्या भागात तातडीने मदत पाठवून कोणतीही जिवीतहानी होणार नाही अशी विनंती चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.