चंद्रपूर : राज्यातील वाढती गुन्हेगारी पोलिसांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. असे असतानाच कौटुंबिक वादाचे प्रकरणेही त्याच गतीने वाढत आहेत. काल सांगली जिल्ह्यात प्रॉपर्टीच्या वादातून नातवांनी आईच्या मदतीने आजीला संपवल्याची घटना ताजी असतानाच विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातूनही एक मोठी घटना समोर आली आहे. पैशाच्या वादातून पोटच्या मुलानेच आईवर कुऱ्हाडीचे घाव करत तिला यमसदनी पाठवले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. (Chandrapur Crime Stomach turned out to be the enemy The mother lost her life in one cut of the ax)
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील लोणी या गावात 21 फेब्रुवारी रोजी दुपारी ही घटना घडली. मृत आईचे नाव कमलाबाई पांडुरंग सातपुते (70) असे आहे. वडिलांचे नाव पांडुरंग सातपुते (78) आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी मुलगा मनोज पांडुरंग सातपुते (45) याला अटक केली.
हेही वाचा : Ludo Game Turns Deadly: लुडो बेतला जीवावर; कात्रीने मित्राचा कापला गळा अन् हत्येनंतर स्वतःलाही संपवलं
शेतीच्या ठेक्यातून मिळालेल्या पैशावरून त्यांच्यात वाद झाला आणि या वादातून ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. आरोपीने आई आणि वडिलांना एका खोलीत बंद केले. यानंतर आईच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केले. तर वडिलांच्या डोक्यावर 2 वार केले. यानंतर तो वहिनीच्या मागे धावला मात्र, ती एका खोलीत लपल्याने तिचा जीव वाचला. या घटनेत आईचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
हेही वाचा : DG Rashmi Shukla : पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांचे पोलिसांसाठी परिपत्रक, घेतला महत्त्वाचा निर्णय
आरोपी मुलगा अटकेत
बुधवारी दुपारी ही घटना घडली. यामध्ये आईचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी वडिलांना कोरपना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, घटनेनंतर पसार झालेल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.